Pizza party: अंतराळवीरांनी अवकाशयानातच केली पिझ्झा पार्टी, पहा व्हिडीओ

तुम्ही मित्रांबरोबर पिझ्झाचा भरपूर आनंद घेतला असेल. पण अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पिझ्झा नाइटचा आनंद घेताना पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे
Pizza party: अंतराळवीरांनी अवकाशयानातच केली पिझ्झा पार्टी, पहा व्हिडीओ
Pizza party: अंतराळवीरांनी अवकाशयानातच केली पिझ्झा पार्टी, पहा व्हिडीओ Instagram/@thom_astro

पिझ्झा. नुसतं नाव उच्चारलं तरी तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये बसून वेगवेगळ्या प्रकारच्या पिझ्झाचा आस्वाद घेणे कोणाला आवडत नाही. लहान मुले असो किंवा प्रौढ पिझ्झा हा सर्वांच्याच आवडीचा. मग अंतराळवीरही त्याला अपवाद कसे असतील? आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS)अंतराळवीरांच्या पिझ्झा पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ-

मित्रांसोबत पिझ्झा खाणे ही नवीन गोष्ट नाही, पण जर कोणी अंतराळात पिझ्झा पार्टी केली तर त्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे. मात्र आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) अंतराळवीरांच्या 'फ्लोटिंग पिझ्झा नाईट'च्या (Floating Pizza Night) व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने सर्वांना आश्चर्यांचा धक्का बसला आहे. अंतराळवीर थॉमस पेस्केटने (Thomas Pesquet) त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, ISS वरील सर्व अंतराळवीरांनी अंतराळात पिझ्झा पार्टीचा आनंद घेताना दिसत आहेत.

अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षणामुळे (Zero gravity) केवळ मानवच नाही तर सर्व काही हवेत तरंगते. हेच कारण आहे की अंतराळात स्वयंपाक करणे खूप कठीण आहे. पण यावेळी अंतराळवीरांनी प्रथमच अंतराळात आणि पार्टीमध्ये जोरदार पिझ्झा बनवला. या पिझ्झा पार्टीचा व्हिडिओ शेअर करताना, अंतराळवीर थॉमसने इन्स्टाग्रामवर लिहिले, 'मित्रांसोबत फ्लोटिंग पिझ्झा नाईट, ही पार्टी म्हणजे पृथ्वीवरील शनिवारप्रमाणे वाटत आहे. चांगला शेफ कधीही त्याचे रहस्य उघड करत नाही, परंतु मी हा व्हिडिओ बनवला आहे.

अंतराळवीरांच्या 'फ्लोटिंग पिझ्झा नाईट'चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक ही व्हिडिओ क्लिप केवळ एकमेकांसोबत शेअर करत नाहीत तर त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि प्रतिक्रिया देखील देत आहेत. आतापर्यंत 5.8 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यासारखे शून्य गुरुत्वाकर्षणात पिझ्झा खाताना अंतराळवीरांना पाहणे खरोखर रोमांचक आहे. बऱ्याच लोकांनी असेही विचारले आहे की, तिथे पिझ्झाला चव कशी लागते? खरं तर, नॉर्थ्रॉप ग्रूममनने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पुरवठा करण्यासाठी सिग्नस रिस्पप्ली स्पेसक्राफ्ट लाँच केले, जे अंतराळवीरांसाठी पिझ्झाच्या विशेष डिलिव्हरीसह पाठवले गेले. याद्वारे अंतराळवीरांना अंतराळात पिझ्झा खाण्याची संधी मिळाली.

Edited By- Anuradha

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com