Viral Video : अरेच्चा! ना बैल ना घोडा थेट बकरीगाडीवर स्वार आजोबा; व्हिडिओ व्हायरल

त्यांनी बैलगाडी आणि घोडागाडी प्रमाणे चक्क बकरीगाडी बनवली आहे.
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video : भारतात प्रत्येक गोष्टीसाठी जुगाड उपलब्ध आहे. आजवर तुम्ही मोटार सायकल, ट्रेन, बस, बैलगाडी, घोडागाडी यामधून प्रवास केला असेल किंवा इतरांना करताना पाहिलं असेल. प्रवास करण्यासाठी काही व्यक्ती हत्तीवर देखील स्वार होतात. मात्र एका व्यक्तीने वेगळ्याच प्राण्याचा प्रवासासाठी उपयोग केला आहे. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे.(Latest Viral Video)

पाळीव प्राण्यांचे अनेक फायदे असतात. गाय, बैल, बकरी, मेंढी, कोंबड्या असे पाळीव प्राणी गावात अनेक व्यक्तींकडे असतात. काहीजण यांच्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. आता बरकी म्हटल्यावर तिचा किती कामांसाठी उपयोग होईल? बकरी दूध देते. त्यामुळे गावात दुधासाठी अनेक जण बकरी पाळतात. मात्र एका आजोबांनी चक्क बकरीचा उपयोग प्रवासासाठी केला आहे. त्यांनी बैलगाडी आणि घोडागाडी प्रमाणे चक्क बकरीगाडी बनवली आहे.

या बाबांची ही गाडी आणि बाबा दोघेही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या बाबांनी दोन बकऱ्यांना समोर बांधलं आहे आणि मागे दोन चाकं लावले आहेत. या चकांमध्ये त्यांनी बसण्यासाठी जागा केली आहे. बैल किंवा घोडागाडी नसल्याने या बाबांनी प्रवासासाठी शोधलेला हा जुगाड पाहून सगळेच चकित झालेत.

Viral Video
Viral Snake Video: महिलेने टॉयलेटसीट उघडताच दिसला साप; पुढे जे घडलं ते भयानकचं

नेटकरी हा व्हिडिओ पाहून यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. या व्हिडिओला 37 लाखांहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत. तसेच लाखो युजर्सनी व्हिडिओवर लाइक्सचा वर्षाव केला आहे. बाबांनी केलेला जुगाड पाहून एकाने लिहिले आहे की, हे असे लोक येतात तरी कुठून. तसेच काहींनी यावर हसण्याचे ईमोजी पाठवले आहेत.

https://i.ytimg.com/an_webp/_EzeVq49HPI/mqdefault_6s.webp?du=3000&sqp=COyfiJ8G&rs=AOn4CLAnYoQAR5r_kL0EtVTHgYsnnYN4jg

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com