प्रेम की वेडेपणा! पत्नीच्या मृतदेहासोबत राहिला 21 वर्ष; जिवंत समजून मारत असे गप्पा

आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. काही त्यांच्या जोडीदारांना अमाप आनंद देतात तर काही जगासाठी उदाहरण बनतात.
प्रेम की वेडेपणा! पत्नीच्या मृतदेहासोबत राहिला 21 वर्ष; जिवंत समजून मारत असे गप्पा
BangkokSaam TV

बँकॉक: आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. काही त्यांच्या जोडीदारांना अमाप आनंद देतात तर काही जगासाठी उदाहरण बनतात. पण थायलंडमधील एका व्यक्तीने आपले प्रेम दाखवण्यासाठी अतिशय आश्चर्यकारक गोष्ट केली आहे. याला कोणीही प्रेम म्हणणार नाही, परंतु वेडेपणा नक्कीच म्हणेल. बँकॉकमध्ये राहणारा 72 वर्षीय व्यक्ती गेल्या 21 वर्षांपासून आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत राहत होता. आता त्याने तिच्यावर अंतिम संस्कार केले आहेत.

दोन दशके पत्नीच्या मृतदेहासोबत राहिल्यानंतर चरण जनवाचकल यांनी पत्नीला अखेरचा निरोप दिला आहे. आपले आपल्या पत्नीवर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी केल्याचे चरण यांनी सांगितले. बँकॉकच्या फाट कासेम फाऊंडेशनच्या मदतीने चरण यांनी पत्नीचे अंत्यसंस्कार केले. 21 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या पत्नीच्या अंत्यसंस्कारात चरण खूप भावूक झाले होते.

पत्नी जिवंत असल्याचा होता विश्वास

21 वर्षांपूर्वी चरण यांच्या पत्नीचा मृत्यू झाला होता, त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह शवपेटीमध्ये ठेवला होता. स्टोअर रूम सारख्या दिसणार्‍या छोट्या पडक्या घरात ते राहत होते. चरण शवपेटीशेजारी रात्र काढत असत. पत्नी जिवंत आहे असे समजून ते तिच्याशी बोलत असत. चरण अत्यंत वाईट परिस्थितीत राहत होते. त्याच्या घरात वीज कनेक्शन नाही आणि ते शेजाऱ्यांकडून पाणी घेऊन त्याचा वापर करतात. दिवसा ते त्यांच्या पाळीव कुत्रा आणि मांजरींसोबत राहतात. मृतदेह लपवून ठेवल्याबद्दल चरणवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, कारण त्याने पत्नीच्या मृत्यूची नोंद केली होती, परंतु ती जिवंत असल्याचे समजून तो तिच्यासोबत राहत होता. फाउंडेशनच्या अधिकार्‍यांनी तिला मृत्यू प्रमाणपत्राची प्रत दिली, ज्यात 2001 मध्ये महिलेचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.

असे आले प्रकरण समोर

चरण नुकतेच मोटारसायकल अपघातात जखमी झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून फाऊंडेशनचे प्रतिनिधी त्यांना भेटून त्यांची काळजी घेण्यासाठी जेवण देत होते. ते घरी येत राहिले, पण शवपेटी त्याच्या लक्षात आली नाही. यानंतर चरण फाउंडेशनच्या अधिका-यांपर्यंत पोहोचले आणि सांगितले की, त्यांच्या पत्नीचा मृतदेह घरात आहे, तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावे. आपला मृत्यू झाला तर आपल्या पत्नीवर नीट अंत्यसंस्कार होणार नाहीत, अशी भीती चरण यांना होती. चरण यांना दोन मुलं आहेत, पण आईच्या मृत्यूच्या धक्क्यातून वडिलांना बाहेर काढता न आल्याने ते त्यांना सोडून निघून गेले.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.