Baramulla Terrorists: CRPF च्या जवानांवर फेकले ग्रेनेड, 2 जवानांसह 1 नागरिक जखमी

जम्मू- काश्मीरमधील बारामुल्ला येथील पल्हालन पट्टणमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे.
Baramulla Terrorists: CRPF च्या जवानांवर फेकले ग्रेनेड, 2 जवानांसह 1 नागरिक जखमी
Baramulla Terrorists: CRPF च्या जवानांवर फेकले ग्रेनेड, 2 जवानांसह 1 नागरिक जखमीSaam Tv

वृत्तसंस्था : जम्मू- काश्मीरमधील Jammu Kashmir बारामुल्ला Baramulla येथील पल्हालन पट्टणमध्ये ग्रेनेड हल्ला attack झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात CRPF चे २ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यामधील पल्हालन चौकात संशयित दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. ज्या हल्ल्यामध्ये २ CRPF निमलष्करी जवान आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी CRPF च्या टीमवर ग्रेनेड फेकले आहे. या घटनेत CRPF चे २ जवान आणि एका नागरिकाला गोळी लागली आहे.

हे देखील पहा-

या सर्वांना उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांना पकडण्याकरिता संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे. दरम्यान दुसरीकडे, उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कर समर्थित दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या जवानांनकडून हाणून पाडण्यात आला आहे. कमाल कोट उरी भागात जवानांनी संशयास्पद हालचाल पाहिल्यावर गोळीबार करण्यात आला आहे.

सैन्याने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. अपडेट सुरू आहे. याचबरोबर जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादाचा खात्मा सुरूच आहे. अलीकडेच, श्रीनगरच्या हैदरपोरा भागात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या एसओजीने विशिष्ट माहितीच्या आधारे हाइपरोपोरा जवळील निवासी भागाला वेढा घातला होता.

Baramulla Terrorists: CRPF च्या जवानांवर फेकले ग्रेनेड, 2 जवानांसह 1 नागरिक जखमी
महिलेने सुखी संसाराचा केला बट्याबोळ; Boyfriend साठी पतीला पण...

या ठिकाणी २ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर झालेल्या चकमकीत सैन्याच्या जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांनी खोऱ्यातील दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार करण्यात आली आहे. तयार करण्यात आलेल्या ३८ दहशतवाद्यांच्या यादीत २७ दहशतवादी लष्करचे असून उर्वरित ११ जैश- ए- मोहम्मदशी संबंधित आहेत. सुरक्षा दल आता निवडकपणे त्यांचा खात्मा करण्याचा प्लान करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com