
Viral Video : एका नववधुचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नवरदेवाच्या एन्ट्रीवर नवरी मुलीने डान्स केला आहे. आपल्या होणाऱ्या साथीदाराला पाहताच नववधूच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य, त्या क्षणाचा आनंद आणि त्या आनंदात तिने केलेला डान्स पाहून तुम्हालाही मस्त वाटेल .
व्हायरल व्हिडीओत दिसतंय त्यानुसार, जेव्हा मिरवणूक दारात पोहोचते तेव्हा नववधू स्वत:ला रोखू शकली नाही. नववधू नवरदेवाला पाहताच नाचताना दिसत आहे. साजन मेरे सतरंगी, मेरा पिया घर आया ओ रामजी या गाण्यावर वधू थिरकताना दिसत आहे. (Latest Marathi News)
नववधूची डान्स करताना आनंद आणि एनर्जी यूजर्सना आवडतेय. वेडिंग वाइब्स या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'Happiness on her face' असे कॅप्शन दिले आहे.
वधूचा हा आनंद आणि उत्साह पाहून आजूबाजूला उपस्थित असलेले लोकही स्वतःला रोखू शकले नाहीत. उपस्थित लोक टाळ्या वाजवत वधुला प्रोत्साहन देताना दिसले. दरम्यान नवरदेवाची एक झलकही व्हिडीओत पाहायला मिळाली. वधूच्या डान्सचा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.