Hijab Row: हिजाब घातलेल्या विद्यार्थींनीना पाठविले परत - बेळगावातील घटना

हिजाबमुळे बंद ठेवण्यात आलेली पदवीपूर्व आणि पदवी महाविद्यालये राज्यात आठ दिवसानंतर बुधवारी (ता. १६) सुरु करण्यात आली. बेळगाव शहरात काही महाविद्यालयात तरुणींनी हिजाब घालूनच प्रवेश केला. मात्र, त्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला नाही
Hijab Row: हिजाब घातलेल्या विद्यार्थींनीना पाठविले परत - बेळगावातील घटना
Hijab Row: हिजाब घातलेल्या विद्यार्थींनीना पाठविले परत - बेळगावातील घटना- Saam TV

बेळगाव : हिजाबमुळे बंद ठेवण्यात आलेली पदवीपूर्व आणि पदवी महाविद्यालये राज्यात आठ दिवसानंतर बुधवारी (ता. १६) सुरु करण्यात आली. बेळगाव शहरात काही महाविद्यालयात तरुणींनी हिजाब घालूनच प्रवेश केला. मात्र, त्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला नाही. या वातावरणामुळे बहूतांशी महाविद्यालयांसमोर बुधवारी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी देखील सरदार्स पी. यु. कॉलेजला भेट देऊन पाहणी केली. (Belgaum college denied entry to hijab clad girls)

राज्यात बुधवारपासून (ता. ९) हिजाबचा (Hijab) वाद निर्माण झाला आहे. तेव्हापासून शाळांबरोबर, पदवीपूर्व व पदवी महाविद्यालये बंदच होती. सोमवारपासून शाळा (Schools) सुरु झाल्या. शाळांमध्ये देखील मुली हिजाब घालूनच प्रवेश करताना दिसल्या. हिजाबवरून मंगळवारी (ता. १६) सरदार्स कॉलेजमध्ये सामाजिक कार्यकर्त्या व पोलिसांत चकमक उडाली. तसेच बुधवारीही शहरातील लिंगराज कॉलेजमध्ये हिजाब परीधान करून आलेल्या विद्यार्थींनीना परत पाठविण्यात आले. यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली.

Hijab Row: हिजाब घातलेल्या विद्यार्थींनीना पाठविले परत - बेळगावातील घटना
'आमंत्रण जेवणाचं अन् ताटात आला वडापाव'; सदाभाऊ खोतांची राऊतांना कोपरखिळी

उच्च न्यायालयाच्या (High Court) अंतरीम आदेशाच्या आधारे पदवीपूर्व व पदवी वर्गात हिजाब घालून येणाऱ्यांना रोखले जाईल, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मत्री बी. सी. नागेश यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यांनुसार बुधवारी ज्या विद्यार्थींनी हिजाब परीधान करून येत होत्या. त्यांना रोखण्यात आले.

शाळा महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या विद्यार्थींनींना प्रवेशद्वाराजवळ अडविले जात होते व शाळेचा ड्रेसकोड घालून येण्याच्या सुचना केल्या जात होत्या. काही विद्यार्थ्यांनीही सुचनांचे पालन केले. मात्र, काही विद्यार्थींनी माघारी फिरल्या. कोणत्याही वादावादीच्या घटना होऊ नयेत. यासाठी प्रत्येक शाळा व महाविद्यालयासंमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com