Bengal News: गरिबीची क्रूर थट्टा! Ambulance साठी पैसे नाहीत; बापाने लेकाचा मृतदेह पिशवीत घेवून केला २०० किमी प्रवास

West Bengal Siligudi News: ६ दिवसांपासून या बालकावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तो वाचू शकला नाही.
Bengal News
Bengal NewsSaamtv

West Bengal News: पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या सिलीगुडमधील एका वडिलांना रुग्णवाहिकेसाठी पैसे नसल्याने आपल्या 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन बसने 200 किलोमीटरचा प्रवास करावा लागला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. (Father Travels 200 Km by Bus With Son body In Bag)

Bengal News
Bullet Modified Silencer : बुलेटचे सायलेन्सर बदलणाऱ्या गॅरेज मालकांवर हाेणार कारवाई; जाणून घ्या कारण

काय आहे संपूर्ण प्रकरण....

याबाबत अधिक माहिती अशी की, पश्चिम बंगालच्या सिलीगुडी अशिम देबशर्मा यांच्या 5 महिन्यांच्या मुलाचा शनिवारी रात्री सिलीगुडी येथील उत्तर बंगाल मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. गेल्या ६ दिवसांपासून या बालकावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तो वाचू शकला नाही. या उपचारासाठी 16 हजार रुपये खर्च झाले. मृत्यूनंतर रविवारी अशिमने रुग्णवाहिका चालकाला मुलाचा मृतदेह कालियागंज येथील त्याच्या घरी नेण्याची विनंती केली.

मात्र चालकाने त्याच्याकडे 8 हजार रुपयांची मागणी केली. मात्र अशिम देबशर्मा यांच्याकडे रुग्णवाहिका चालकाला देण्यासाठी 8,000 रुपये नव्हते, म्हणून त्यांनी 5 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह सार्वजनिक बसमधून कालियागंजला नेण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

Bengal News
Pune News: महिलेला २३ वर्षांनी मिळाला न्‍याय; फसवणूक केल्याप्रकरणी होता गुन्हा

व्यक्त होतोय संताप...

देबशर्मा यांनी मुलाचा मृतदेह एका पिशवीत ठेवला आणि दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलीगुडी ते 200 किमी अंतरावर असलेल्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील कालियागंजपर्यंत बसने प्रवास केला. बसमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांनाही त्याने त्याचा सुगावा लागू दिला नाही. इतर प्रवाशांना हा प्रकार कळला तर ते त्याला बसमधून उतरवतील, अशी भीती आशिमला होती.

या धक्कादायक प्रकारानंतर सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात असून पश्चिम बंगालचे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. भाजपने BJP) ममता बॅनर्जी सरकारच्या 'स्वास्थ्य साथी' योजनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर तृणमूल काँग्रेसने हे चुकीचे राजकारण असल्याचे म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com