Karnataka HC: बहीण कुटुंबाची सदस्य नाही, भावाच्या मृत्यूनंतर नोकरी देता येणार नाही: हायकोर्ट

Sister Not Part Of Family: सरकारी नोकरीवर त्याच्या बहिणीचा अधीकार नाही, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
Karnataka HC
Karnataka HC

Bengaluru:

कर्नाटक उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या बहिणीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली जाऊ शकत नाही. यासोबतच बहीण ही विवाहित भावाच्या कुटुंबाचा भाग नाही, असंही न्यायालयाने स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने कर्नाटक नागरी सेवा नियमाचा आधार घेत हा महत्वपूर्ण निकाल देत महिलेची विनंती फेटाळली आहे.

Karnataka HC
Bengaluru Crime News: ऑनलाईन बायको शोधण्याच्या नादात सगळंच गेलं? कोट्यवधींचा गंडा अन् तोंड लपण्याचीही वेळ आली

कर्नाटक नागरी सेवा नियम, १९९९ अंतर्गत कुटुंबाच्या व्याख्येत बहीण नाही. म्हणजे जर एखादा व्यक्ती सरकारी नोकरीवर आहे. त्याच्या कुटुंबात पत्नी, मुलं आणि लहान बहीण असा परिवार असेल. काही काळाने भावाचे निधन झाले,तर त्या सरकारी नोकरीवर त्याच्या बहिणीचा अधिकार नाही, असं कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

तुमाकुरू येथील तिप्तूर तालुक्यातील रहिवासी असलेल्या पल्लवी यांनी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी आपल्या भावाच्या सरकारी नोकरीवर आपली नियुक्ती करण्यात यावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अर्ज दिला होता. ४ नोव्हेंबर २०१६ रोजी त्यांच्या भावाचे निधन झाले होते. १३ नोव्हेंबर रोजी महिलेची विनंती नाकारण्यात आली.

पुढे पल्लवी यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे सरन्यायाधीश प्रसन्ना बी वराळे आणि न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित यांच्या खंडपीठाने पल्लवी यांची याचिका फेटाळली. कर्नाटक नागरी सेवा नियम, १९९९ अंतर्गत त्या भावाच्या कुटुंबातील सदस्य नसल्याचे स्पष्ट केले.

Karnataka HC
Mumbai High court on MU Senate Election: सिनेट निवडणूक स्थगित का केली? मुंबई हायकोर्टाचा विद्यापीठ आणि राज्य सरकारला सवाल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com