मुख्याध्यापकाचं महिला शिक्षिकेसोबत धक्कादायक कृत्य; पोलिसांत गुन्हा दाखल

भरपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेतील धक्कादायक घटना
Rajasthan Crime News Latest Update, Rajasthan Latest Marathi News
Rajasthan Crime News Latest Update, Rajasthan Latest Marathi News SAAM TV

भरतपूर : विद्येच्या मंदिराला लाजवेल अशी एक धक्कादायक घटना राजस्थानमधून समोर आली आहे. येथील एका मुख्याध्यापकाने चक्क महिला शिक्षिकेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भातील तक्रार पीडित शिक्षिकेने पोलिसांत दाखल केली आहे. राजस्थानमधील भरपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील ही धक्कादायक घटना आहे. (Rajasthan Crime News)

Rajasthan Crime News Latest Update, Rajasthan Latest Marathi News
Airtel ने लॉंच केले ४ जबरदस्त प्लान; डेटा आणि कॉलिंगसह मिळणार बरंच काही

पीडित शिक्षिकेचा आरोप आहे की, मुख्याध्यापकाने तिचा वारंवार विनभंय केला तसेच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. शिक्षिकेने मुख्याध्यापकांविरुद्ध कुम्हेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने विभागीय कारवाईसाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्रही लिहिले आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कुम्हेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सरकारी शाळेत शिक्षिका आहे. पीडित शिक्षिकाने तक्रार दाखल केली आहे की, सदरील मुख्याध्यापक शाळेतच तिच्यासोबत अश्लील कृत्य करतो. तसेच ती वॉशरुममध्ये गेल्यानंतर तिच्यावर सतत नजर ठेवतो. शिक्षिकेचा आरोप आहे की, मुख्याध्यापकाने तिच्यावर अनेकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण कशीतरी तिने त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. (Rajasthan Latest Crime News)

Rajasthan Crime News Latest Update, Rajasthan Latest Marathi News
देशात कोरोनाचा वेग वाढला; 24 तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या, 28 मृत्यू

4 महिन्यांत अनेकदा बलात्काराचा प्रयत्न

महिला शिक्षिकेने सांगितले की, मुख्याध्यापक हा 4 महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत होता. शाळेत गेल्यानंतर तो सतत तिचा विनयभंग करायचा. समाजात आपली बदनामी होईल म्हणून ती हे सर्व सहन करत होती. मात्र आता मुख्याध्यापकांनी सर्व मर्यादा ओलांडल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटना कुटुंबीयांना सांगितली. विशेष म्हणजे राजस्थानमध्ये यापूर्वीही अशा लाजिरवाण्या घटना समोर येत आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com