Gujrat New CM : आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची भूपेंद्र पटेल शपथ घेणार

भूपेंद्र पटेल आज दुपारी 2.20 मिनिटांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार
Gujrat New CM : आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची भूपेंद्र पटेल शपथ घेणार
Gujrat New CM : आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची भूपेंद्र पटेल शपथ घेणारSaam Tv

गुजरात - भूपेंद्र पटेल Bhpendra Patel यांची गुजरातच्या Gujrat मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. भूपेंद्र पटेल आज दुपारी 2.20 मिनिटांनी मुख्यमंत्री Chief Minister पदाची शपथ घेणार असून दोन दिवसांनी कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधी समारंभासाठी गृहमंत्री अमित शाह Amit Shah उपस्थित राहणार आहेत. ते आज दुपारी 12.30 वाजता अहमदाबादमध्ये Ahmedabad पोहोचणार आहेत.

हे देखील पहा -

तसेच अमित शाह यांच्या व्यतिरिक्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांसाठी नितीन पटेल, मनसुख मांडविया आणि पुरुषोत्तम रुपाला या तीन नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र भाजपने मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या हाती गुजरातची कमान दिली.

Gujrat New CM : आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची भूपेंद्र पटेल शपथ घेणार
नवी मुंबईत माणुसकीला काळिमा फासणारी घटना, प्लास्टिक पिशवीत मृतदेहाचे तुकडे

काल १२ सप्टेंबर रोजी भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर मोहोर लावण्यात आली. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावे चर्चेत होती मात्र भाजपने एका नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला आणि भूपेंद्र पटेल यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपावली. गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांना जेमतेम वर्षभराचा अवधी शिल्लक असल्याने विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com