iphone news: अॅपल कंपनीवर मोठी कारवाई; १६४ कोटींच्या दंड वसूलीसह आयफोन जप्त

गेल्याच महिन्यात अॅपलने २० मिलीयन डॉलर म्हणजेच १६४ कोटींचा दंड भरला आहे.
i phone news
i phone newsSaam TV

iphone news: अॅपल फोन कंपनी विषयी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या कंपनीवर ब्राझील येथे कारवाई करण्यात आली आहे. अॅपल कंपनीने फोनबरोबर चार्जर देणे बंद केले आहे. याच कारणाने ब्राझीलमध्ये ऑपरेशन डिस्चार्ज अंतर्गत सरकारने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यात अनेक आयफोन जप्त केले आहेत.

विजेवर चालणाऱ्या प्रत्येक वस्तूवर चार्जर देणे गरजेचे आहे. चार्जर नसेल तर ती वस्तू खरेदी केल्यावर ग्राहकांना चार्जरसाठी वेगळे पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे अशा वस्तूंवर चार्जर मिळवणे ग्राहकांचा हक्क असल्याचे असेल ब्राझील शासनाचे म्हणणे आहे.

i phone news
Mobile Phone Hacking : सावधान ! Android युजर्स 'या' चुका अजिबात करु नका; पडेल महागात, आयुष्यभराची कमाई जाईल पाण्यात

सर्व आयफोन जप्त

अॅपल या कंपनीवर या आधी देखील अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. वारंवार दंड भरावा लागत असला तरी अजूनही या कंपनीने चार्जरची सुवीधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळेच ब्राझील सरकारने आता दंड वसूल न करता मोबाईलवर थेट जप्ती आणली आहे. ब्राझीलमधील अॅपलच्या सर्वच अधिकृत दुकानांवर ही कारवाई झाली आहे.

i phone news
I phone 14 | बहुप्रतीक्षित आयफोन 14 लाँच, भारतात 80 हजारांपासून सुरुवात

१६४ कोटींचा दंड भरूनही जैसे थे...

अॅपल कंपनीने आयफोन (I Phone) बरोबर चार्जर न दिल्याने आणखीन एक गॅजेट खरेदी करण्यास ग्राहकांना भाग पाडले आहे, असे ब्राझील कोर्ट न्यायाधीशांनी म्हटले आहे. तसेच सुरुवातीला ब्राझील मंत्रालयाने कंपनीवर २.५ मिलीयन डॉलरचा दंड (Fine) आकारला होता. असाच दंड फ्रांसमधूनही आकारला गेला आहे. तसेच गेल्याच महिन्यात अॅपलने २० मिलीयन डॉलर म्हणजेच १६४ कोटींचा दंड भरला आहे. एवढा दंड भरूनही अॅपलने चार्जर न पुरवल्याने आता कंपनीवर जप्तीची कारवाई केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com