Pan-Aadhaar Link : आयकर विभागाचा मोठा निर्णय ! नागरिकांनो पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करा, अन्यथा...

तुम्ही देखील अद्याप आधारकार्डला पॅनकार्ड लिंक केले नसेल तर आजच करा. कारण तसे न केल्याने भविष्यात तुमचे मोठे नुकसान होईल.
Pan Aadhaar Link
Pan Aadhaar LinkSaam TV

Pan Aadhaar Link : पॅनकार्ड हे प्रत्येक व्यक्तीचा वित्तीय लोखाजोखा तपासण्यासाठी फार महत्वाचे आहे. बॅंकेतील आणि विविध आर्थिक व्यवहारांमध्ये पॅनकार्ड नेहमीच विचारले जाते. अशात शासनाने सर्व पॅनकार्ड आधारकार्डला लिंक करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी वारंवार तारखा देखील वाढवून देण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही अनेकांनी पॅनकार्ड लिंक केलेले नाही. तुम्ही देखील अद्याप आधारकार्डला पॅनकार्ड लिंक केले नसेल तर आजच करा. कारण तसे न केल्याने भविष्यात तुमचे मोठे नुकसान होईल.

१००० रुपयांचा दंड भरणे अनिवार्य

सरकार मार्फत या संदर्भात वारंवार सुचना देण्यात आल्या होत्या. या सुचनांकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे सरकारने नागरिकांसाठी पॅनकार्ड लिंक करण्याची मुदतही वाढवली . ३० जून पर्यंत ही मुदत वाढ होती. मात्र अजूनही अनेकांचे पॅनकार्ड लिंक होणे बाकी आहे. त्यामुळे आता सरकारने १००० रुपयांचा दंड (Fine) वसूल करण्यास सुरूवात केली आहे. १००० रुपये दंड भरून तुम्ही ३१ मार्च २०२३ पर्यंत तुमचे पॅनकार्ड आधारला लिंक करू शकता.

कोणत्याही कामाचे राहणार नाही पॅनकार्ड

इनकम टॅक्स (Income tax) विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंवर माहिती दिली आहे की, "प्राप्तिकर कायदा, १९६१ नुसार, सवलत श्रेणीत न येणाऱ्या सर्व पॅन धारकांसाठी आधारबरोबर पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख ३१.०३.२०२३ आहे. जर पॅन आधारशी लिंक नसेल तर पॅन निष्क्रिय होईल. उशीर करू नका, आजच लिंक करा!" शेवटच्या तारखेपर्यंत जर पॅनकार्ड लिंक केले नसेल तर तुम्हाला म्युचल फंड, स्टॉक मार्केट अशा कोणत्याही ठिकाणी खाते उघडता येणार नाही.

Pan Aadhaar Link
Ration Card Holders : 'या' शिधापत्रक धारकांना मिळणार मोफत गहू, तांदूळ, तेल आणि मीठ; असा घेता येईल लाभ

रद्द होईल पॅन कार्ड

दिलेल्या मुदतीत तुम्ही पॅन लिंक न केल्यास तुमचे पॅनकार्ड रद्द होईल. तुम्ही रद्द झालेले पॅनकार्ड बॅंक किंवा आर्थिक व्यवहारात कुठेही वापरू शकणार नाही. जर तुम्ही रद्द झालेले पॅनकार्ड कोणत्याही व्यवहारात वापराल तर त्यासाठी तुमच्याकडून भरमसाठ दंड वसूल केला जाईल. आयकर अधिनियम १९६१ कलम २७२ब नुसार असे केल्यास तुमच्याकडून १० हजारांचा दंड वसूल केला जाईल.

Pan Aadhaar Link
PAN-Aadhaar Link पुढच्या वर्षापर्यंत करु शकता पण आता द्यावे लागणार एवढे पैसे

असे करा पॅनकार्ड आधारला लिंक

यासाठी सर्वात आधी www.incometax.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.

क्विक लिंक सेशन या पर्यायातून लिंक आधारवर क्लिक करा.

समोर दिसत असलेल्या पेजवर तुमचा पॅन, आधार आणि संपर्क क्रमांक टाका.

पुढे I Validate my Aadhaar Detail's हा पर्याय निवडा.

नंतर तुमच्या रजिस्टर नंबरवर ओटीपी टाका.

१००० रुपयांचा दंड भरल्यानंतर तुमचे आधार पॅनबरोबर लिंक होईल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com