रेशन कार्डबाबत मोठी बातमी, केंद्राने केले 'हे' बदल

तुम्हीही रेशन कार्डधारक (ration cards) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
Centre Cuts Wheat Quota Under PMGKAY
Centre Cuts Wheat Quota Under PMGKAYSaam Tv

नवी दिल्ली: तुम्हीही शिधापत्रिकाधारक (ration cards) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने (Central Government) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढवला आहे. अनेक राज्य (State) आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना पूर्वीपेक्षा कमी गहू मिळणार आहे.

खरं तर, केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मे ते सप्टेंबर या कालावधीत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी केला आहे. यानंतर, PMGKAY अंतर्गत बिहार, केरळ (Kerala) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) या ३ राज्यांना मोफत वितरणासाठी गहू दिला जाणार नाही. याशिवाय दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. उर्वरित २५ राज्यांच्या कोट्यात कोणताही बदल करण्यात आला नाही.

हे देखील पाहा-

गव्हाच्या कमी झालेल्या कोट्याची भरपाई तांदळातून केली जाईल

केंद्राने राज्यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, 'मे ते सप्टेंबर या उर्वरित ५ महिन्यांसाठी सर्व ३६ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी तांदूळ आणि गव्हाच्या PMKGAY वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितले की, गव्हाच्या कमी झालेल्या कोट्याची भरपाई तांदळातून केली जाईल.

गव्हाची कमी खरेदी हे राज्यांसाठी कमी कोट्याचे कारण सांगितले जात आहे. अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले, 'सुमारे ५५ लाख मेट्रिक टन तांदळाचे अतिरिक्त वाटप केले जाणार आहे, तेवढ्याच गव्हाची देखील बचत होईल.' दोन टप्प्यांत सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांशी व्यापक चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Centre Cuts Wheat Quota Under PMGKAY
'मी पुन्हा येईल...' मंत्री अब्दुल सत्तारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

पांडे म्हणाले की ही दुरुस्ती केवळ पीएमजीकेवायसाठी आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा-२०१३ अंतर्गत वाटपावर राज्यांशी चर्चा सुरू आहे. 'काही राज्यांना NFSA अंतर्गत अधिक तांदूळ घ्यायचे असतील तर आम्ही त्यांच्या विनंतीचा विचार करू' असेही ते म्हणाले.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये कमी केलेला गव्हाचा कोटा आता जूनपासून राज्यात कमी गहू आणि जास्त तांदूळ दिला जाणार आहे. राज्यातील १४ लाख शिधापत्रिकाधारकांना जूनपासून प्रति युनिट ३ किलो गव्हाऐवजी १ किलो गहू मिळणार आहे. तर तांदूळ २ किलोऐवजी ४ किलो देण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com