BIG NEWS: तिन्ही कृषी कायदे रद्द, शेतकऱ्यांना घरी परतण्याचं मोदींच आवाहन...

तिन्ही कृषी कायदे रद्द: चला एक नवी सुरुवात करुया, नव्या जोशानं पुढे जाऊया असं म्हणत शेतकऱ्यांना घरी परतण्यातचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.
BIG NEWS: तिन्ही कृषी कायदे रद्द, शेतकऱ्यांना घरी परतण्याचं मोदींच आवाहन...
BIG NEWS: तिन्ही कृषी कायदे रद्द, शेतकऱ्यांना घरी परतण्याचं मोदींच आवाहन...Saam Tv

नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षांपासून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आहे. केंद्र सरकार तिन्ही नवे कृषी कायदे परत घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. चला एक नवी सुरुवात करुया, नव्या जोशानं पुढे जाऊया असं म्हणत शेतकऱ्यांना घरी परतण्यातचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे. (BIG NEWS: All three agriculture laws repealed, Modi's appeal to farmers to return home)

मोदी आपल्या भाषणात म्हणाले की, गुरुनानक जयंतीच्या पवित्र प्रकाश पर्व आहे, मी देशवासीयांना शुभेच्छा देतो. दीड वर्षांनंतर करतारपुर साहिब कॉरिडोर पुन्हा उघडले. गुरु नानक म्हणाले की, संसारात सेवेचा मार्ग अवलंबल्यानेच आयुष्य यशस्वी होतं. याच सेवा भावनेने आमचं सरकार देशवासियांचं जीवन सोपं करण्याचं काम करतंय. कितीतरी पिढ्या या स्वप्नांना खरं होण्याची वाट बघत होते, भारत आज त्या स्वप्नांना पुर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करतोय. मी माझ्या पाच दशकांच्या सार्वजनिक आयुष्यात शेतकऱ्यांसमोरील आव्हानं आणि दुखः जवळून बघितलं आहे. म्हणून २०१४ रोजी जेव्हा देशाने मला पंतप्रधान म्हणून सेवा करण्याची संधी दिली तेव्हा आम्ही कृषीविकास आणि शेतकऱ्यांचं कल्याण यांना प्राथमिकता दिली.

हे देखील पहा -

बहुतेक लोकांना माहित नाही की, देशात १०० पैकी ८० शेकतरी हे छोटे शेतकरी आहेत, त्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. तुम्ही कल्पना करु शकतात की, या छोट्या शेतकऱ्यांची संख्या १० कोटीपेक्षा जास्त आहे. त्यांच्या पुर्ण आयुष्याचा आधार हा जमिनीचा छोटा तुकडा आहे. पीढ्यान-पीढ्या त्याचे हिस्से होऊन जमीन अजून लहान होते. म्हणून देशातल्या छोट्या शेतकऱ्यांची संकटं दूर करण्यासाठी आम्ही बियाणे, बीमा, बाजार आणि बचत या सगळ्यांवर चौतरफा काम केलं. सरकारने चांगल्या दर्जेच्या बियांणासोबत निम्कोटेल युरीआ, सॉईल हेल कार्ड, मायक्रो इरिगेशन यांसारख्या सुविधांशी जोडलं.

आम्ही २२ करोड सॉईल हेल कार्ड शेतकऱ्यांना दिले आणि या वैज्ञानिक अभियानामुळे शेतीचे उत्पादनही वाढले. आम्ही फसल बीमा योजनेला अधिक प्रभावी बनवलं. जुने नियम बदलले त्यामुळे गेल्या चार वर्षात १ लाख करोडपेक्षा जास्त अनुदान शेतकऱ्यांना मिळालं आहे. आम्ही छोट्या शेतकऱ्यांच्या आणि श्रमिकांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी थेट त्यांच्या खात्यात १ लाख ६२ हजार करोड रुपये पाठवण्यात आले. देशातल्या १ हजारपेक्षा जास्त बाजार समित्यांना ई-नामद्वारे जोडले. केंद्र सरकारचा कृषी बजेट पाच पटीनं वाढलं आहे. प्रत्येक वर्षी सव्वा लाख करोड रुपये कृषी क्षेत्रात खर्च केले जात आहेत.

तिन्ही कृषी कायदे मागे

देशात तीन कायदे आणले गेले. शेतकऱ्यांसाठी हे कायदे आणले गेले होते. गेल्या अनेक वर्षांपासून हे कायदे आणण्यासाठी मागणी होती. देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांनी या कायद्याचं स्वागत केलं त्यासाठी त्यांचं धन्यवाद. मात्र काही शेतकऱ्यांना आम्ही हा कायदा समजवू शकलो नाही. आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण समजवू शकलो नाही. आज गुरुनानाक जयंतीचा पवित्र दिवस आहे. या दिवशी मी सांगू इच्छित आहे की आम्ही हे तिन्ही कृषी कायदे मागे घेत आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत हे कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पुर्ण करत आहे.

BIG NEWS: तिन्ही कृषी कायदे रद्द, शेतकऱ्यांना घरी परतण्याचं मोदींच आवाहन...
केंद्रीय तीनही कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

चला एक नवी सुरुवात करुया

मी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की, आज गुरु पर्वाचा पवित्र दिवस आहे आता तुम्ही आपापल्या घरी परता, आपल्या शेतात आपल्या परिवाराकडे पुन्हा जा, चला एक नवी सुरुवात करुया, नव्या जोशानं पुढे जाऊया असं आव्हान पंतप्रधानांनी केलं आहे. एमएसपीला अधिक प्रभावी आणि पारदर्शी बनवण्यासाठी एक कमिटी बनवली जाईल. या कमिटीमध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारचे प्रतिनिधी, शेतकरी, कृषी वैज्ञानिक, कृषी अर्थशास्त्रज्ञ असे अनेक लोकं असतील असंही मोदी म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com