
Bihar Crime News: जमिनीच्या वादातून अवघ्या ८ वर्षाच्या चिमुकलीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील (Bihar) भोजपूरच्या उदवंत नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भेलाई गावात ही भयंकर घटना घडली आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी निष्पाप चिमुकलीची हत्या केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे..
आराध्या कृष्ण कुमार सिंह असे या मृत चिमुकलीचे नाव असून ती पहिलीत शिकते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेऊन सदर रुग्णालयात शवविच्छेदन केले. (Latest Marathi News)
याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेदिवशी रात्री ९ वाजता ही ८ चिमुकली तिच्या घरात अभ्यास करत बसली होती. यावेळी घरातील इतर मंडळी जेवण करण्याच्या तयारीत व्यस्त होते. त्याचवेळी काही लोक घराच्या गेटजवळ पोहोचतात आणि जोरजोरात दार ठोठावतात. ती निरागस मुलगी हातात पेन्सिल घेऊन गेट उघडायला जाते तेव्हा गेट उघडताच काही सशस्त्र लोक घरात घुसतात. ते मुलीला तिच्या वडिलांबद्दल विचारतात.
मुलगी त्यांच्याशी बोलत असतानाच नराधमांनी तिच्या छातीत गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये या आराध्याचा जागीच मृत्यू झाला. जमिनीच्या एका तुकड्यासाठी निष्पाप मुलीचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या खळबळजनक घटनेनंतर कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा बजरंगी सिंग सोनू आणि प्रेमचंद कमलेश यांच्यासोबत जमिनीचा वाद आहे. त्यांनीच गुंडांना पाठवून ही हत्या घडवून आणली. हत्या करणाऱ्या सर्व आरोपींची नावेही त्यांनी सांगितली असून पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत. (Crime News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.