Patna Civil Court Blast: बिहारमधील पाटणा सिव्हिल कोर्टात स्फोट, पोलिसांनीच आणला होता बॉम्ब

बिहारमधील पाटणा येथील सिव्हिल कोर्टात ही घटना घडली आहे.
Bihar blast reported in civil court of Patna Latest News in Marathi (ANI)
Bihar blast reported in civil court of Patna Latest News in Marathi (ANI)SAAM TV

पाटणा: बिहारची राजधानी पाटणा येथील सिव्हिल कोर्टात शुक्रवारी स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात तीन पोलीस जखमी झाले आहेत. त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बॉम्बचा स्फोट झाला ते पुरावे म्हणून कोर्टात आणण्यात आले होते. संबंधित प्रकरणात कोर्टातील न्यायाधीशांसमोर हे बॉम्ब दाखवण्यात येणार होते. मात्र, खटल्याचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच स्फोट झाला. (Patna Civil Court Blast)

Bihar blast reported in civil court of Patna Latest News in Marathi (ANI)
Nupur Sharma: टीव्हीवर जा आणि माफी मागा; नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं

कोर्ट (Court) परिसरात बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. कोर्टात पुरावे म्हणून बॉम्ब घेऊन येणारे पोलीस या स्फोटात जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोर्टात शुक्रवारी एका प्रकरणात पुरावे म्हणून अगमकुआं पोलीस (Police) ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी बॉम्ब घेऊन आले होते. ते बॉम्ब एका प्रकरणात पुरावे म्हणून सादर करण्यात येणार होते. मात्र, त्याचवेळी त्यांचा स्फोट (Blast) झाला. या स्फोटात अगमकुआं पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले.

जखमी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपचारांसाठी तात्काळ पीएमसीएच रुग्णालयात नेण्यात आले. या स्फोटात जखमी झालेल्या अधिकाऱ्याचे नाव सुधीर कुमार आहे.

Bihar blast reported in civil court of Patna Latest News in Marathi (ANI)
मणिपूरमध्ये भूस्खलन; आतापर्यंत 7 जवानांसह 14 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

एका प्रकरणाचा तपास करताना अगमकुआं पोलीस ठाण्याच्या हद्दीत जिवंत बॉम्ब सापडला होता. तोच बॉम्ब या प्रकरणात कोर्टात पुरावा म्हणून सादर करण्यात येणार होता. दरम्यान, बॉम्ब योग्यरितीने डिफ्युज केला नव्हता का, असा प्रश्न उपस्थित होत असून, या घटनेचा तपास आता पीरबहोर पोलीस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com