
छपरा, बिहार: अवैध फटाक्यांच्या कारखान्यात (Illegal Firecracker Factory) भीषण स्फोट होऊन सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ही धक्कादायक घटना बिहार (Bihar) राज्यातील छपरा (Chhapra Explosion) गावात घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, यात अख्यं घर उडालं आहे. या स्फोटामुळे घरातील ६ जणांचे मृतदेह मिळाले आहेत तर, काहीजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. स्थानिक प्रशासनाकडून मतदकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मार्च महिन्यातही बिहारच्या भागलपूरमध्ये असाच भीषण स्फोट झाला होता. या घटनेमुळे बिहारमधील अवैध फटाक्याच्या कारखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Chhapra Firecracker Explosion News)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार फटाक्यांसोबतच सिलिंडरचाही स्फोट झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. स्फोटाचा आवाज दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटामुळे इमारत कोसळली आहे, त्यामुळे ढिगारा हटवल्यानंतरच ही घटना कशी घडली हे तपासात पुढे येणार आहे. या स्फोटानंतर पोलीस आणि प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या असून त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, मात्र त्यानंतरही रहिवासी भागात असे अनेक अवैध फटाके कारखाने सुरू आहेत.
याबाबत एसपी संतोष कुमार म्हणाले की, येथे स्फोटामुळे घर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही स्फोटामागील कारणाचा तपास करत आहोत. फॉरेन्सिक टीम आणि बॉम्ब निकामी पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
याच वर्षी ३ मार्चच्या रात्री बिहारमधील भागलपूर अशाच एका स्फोटाने हादरले होते. या स्फोटात अर्धा डझन घरे खाक झाली होती. स्फोट इतका जोरदार होता की त्यामुळे लोकांना भूकंप झाल्याचा भास झाला. रात्री झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा बिहारच्या छपरा जिल्ह्यात स्फोट झाला आहे. यावरून बिहार बारुदाच्या ढिगाऱ्यावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.