
बिहार : बिहारच्या (Bihar) गोपालगंजमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. साप चावल्यानंतर साधारणपणे व्यक्तीचा मृत्यू होतो. मात्र बिहारमध्ये चार वर्षाच्या मुलाला कोब्रा सापाने (Snake) दंश केला, त्यानंतर सापच काहीवेळाने तडफडून मेला आहे. दुसरीकडे सापाने दंश केलेल्या मुलाला काहीच झाले नाही. ही घटना गोपालगंज जिल्ह्यातील बरौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्यामुळे सापाने दंश केल्यानंतर मुलाला काहीच न झाल्याने गावात चर्चा सुरू झाली आहे. (Bihar Latest News In Marathi )
माधोपूर गावात राहणाऱ्या रोहित कुमार यांच्या अनुज नामक चार वर्षीय मुलगा हा त्यांच्या आजोबाच्या कुचायकोट गावी सांयकाळी त्यांच्या मित्रांसोबत अंगणात खेळत होता. खेळत असताना अचानक त्याला कोब्रा सापाने दंश केला. त्यानंतर त्याच्यासोबतचे मित्र सर्व पळून गेले. मात्र मुलाजवळ उभे असलेल्या काही लोकांनी काठी घेऊन सापाला मारायला धावले. मात्र त्याआधीच साप त्यांच्या तावडीतून निसटला.
सापाने दंश केल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. उपचारानंतर मुलगा मस्त खेळत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेनंतर मुलाच्या नातेवाईकांनी मुलाला दंश केलेल्या सापाला एका डब्ब्यात टाकून रुग्णालयात नेले. मुलाला चावलेला साप मृत अवस्थेत आढळून आला.
दरम्यान, मुलाच्या आईने सांगितले की, मुलगा घराच्या अंगणात खेळत होता. मात्र त्यावेळी त्याला विषारी सापाने दंश केला. साप दंश केल्याचे त्याने रडत रडत सांगितले. त्यानंतर मुलाचा मामा पटकन घटनास्थळी जाऊन सापाला मारायला गेला. त्यावेळी साप सरपटताना दिसला. मात्र थोड्यावेळाने साप घटनास्थळी तडफडून मेला. मात्र, सापाने दंश केलेल्या मुलाची तब्येत ठीक आहे. त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.