Siwan BJP Leader Shot Dead: धक्कादायक! रात्री घरी जाताना भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या; बिहारमध्ये खळबळ

Siwan BJP Leader Shot Dead: बिहारच्या सीवानमध्ये सोमवारी रात्री एका भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Siwan BJP Leader Shot Dead
Siwan BJP Leader Shot DeadSaam tv

Siwan BJP Leader shot Dead:

बिहारच्या सीवानमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या सीवानमध्ये सोमवारी रात्री एका भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या सीवान येथील भाजप नेते शिवजी तिवारी यांची काही जणांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या हल्ल्यतात त्यांच्या मेहुण्यालाही गोळी लागून गेली आहे. मात्र, त्यांची स्थिती गंभीर नाही. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. सोमवारी रात्री दुकान बंद करून मेहुणा प्रदीप पांडे यांच्यासोबत घरी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

Siwan BJP Leader Shot Dead
Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयकावर मायावतींची पहिली प्रतिक्रिया; SC-ST, OBC महिलांसाठी केली विशेष मागणी

या घटनेत शिवजी तिवारी यांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गोळी त्यांचा मेहुण्याला देखील लागून गेली. मेहुण्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. या घटनेनंतर तिवारी यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना घटनेची सविस्तर माहिती दिली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू

तत्पूर्वी, शिवजी तिवारी यांच्या कुटुंबातील आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. चार जणांच्या मृत्यूने कुटुंबातील सदस्य दु:खात होते. शिवजी यांचा चुलत भाऊ बब्बन तिवारी यांचा ऑगस्टमध्ये मृत्यू झाला होता. तसेच त्यांच्या दोन वहिनींचा देखील मृत्यू झाला आहे. त्यानंतर शिवजी तिवारी यांची रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

भावाने सांगितला संपूर्ण थरार

मृत भाजप नेत्याच्या भावाने सांगितलं की, 'मंगळवारी दोन मृत वहिणीचं श्राद्ध होतं. त्यासाठी शिवजी तिवारी यांची तयारी सुरु होती. सोमवारी रात्री किराणा दुकान बंद करून घरी जात असताना काही अंतरावरून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात गोळी थेट त्यांच्या गळ्याला छेदून आरपार गेली.

या गोळीबाराचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी शिवजी तिवारी आणि त्यांच्या मेहुण्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी शिवजी तिवारी यांना तपासून मृत घोषित केले.

Siwan BJP Leader Shot Dead
Tamil Nadu News: खळबळजनक... शोरमा खाल्ल्याने शाळकरी मुलीचा मृत्यू; १२ जण रुग्णालयात दाखल

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com