Bihar Crime News : दुधाचे पैसे मागायला गेलेल्या व्यक्तीवर गोळीबार, पत्नी आणि मुलालाही बेदम मारहाण

Crime News : बिहारच्या वासुदेवपूर ओपी परिसरातील जानबेहरा गावात ही घटना घडली आहे.
Crime News
Crime Newssaam tv

Bihar Crime News :

बिहारमधील मुंगेरमध्ये दुधाचे पैसे मागायला गेलेल्या महिलेला आणि तिच्या मुलाला गुंडांनी मारहाण केली. तसेच तिच्या पतीवर देखील गोळीबार केला आहे. या घटनेत तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बिहारच्या वासुदेवपूर ओपी परिसरातील जानबेहरा गावात ही घटना घडली आहे. जखमी इंदुमतीने तिची आपबिती सांगितली. पती रमेश यादव याने ५-६ महिन्यांपूर्वी त्यांच्या परिसरातील व्यावसायिकाला व्यवसायासाठी एक लाख रुपये दिले होते आणि दूधाचा पुरवठा देखील केला होता. मात्र तो ना दुधाचे पैसे देत होता, ना एक लाख रुपये परत करत होता. (Latest Marathi News)

Crime News
Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमागे भारताचा हात असू शकतो? कॅनडाचे PM जस्टिन ट्रूडो यांना संशय

सोमवारी सायंकाळी उशीरा ही महिला पैसे मागण्यासाठी आरोपीच्या घरी गेली असता, तिथे वाद झाला. दरम्यान, गुंडांनी इंदूमतील आणि तिच्या मुलाला बांबूने मारहाण करत जखमी केले.

या गोंधळानंतर पती रमेश यादव तिथे पोहोचला. तेव्हा गुंडांनी त्यालाही मारहाण केली. यावेळी आरोपी छोटू सावने गोळीबार केला. गोळी रमेशच्या तोंडाला आणि छातीला लागली. (Crime News)

Crime News
Pune Crime News: 'आमच्याशी कोणी पंगा घेतला तर...' म्हणत टोळक्यांकडून तरुणाची हत्या; पुण्यातील घटनेने नागरिक दहशतीत

पोलिसांना याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. पैशाच्या व्यवहारातून गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. पीडितेकडून आरोपींनी दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. पैसे मागण्यासाठीच ती तिथे गेली होती, अशी माहिती पोलिसांना दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com