Breaking News : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवींच्या घरी पोहचली सीबीआयची टीम; काय आहे प्रकरण?

बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राजद नेते लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
rabri devi
rabri deviSaam tv

पाटणा : बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि राजद नेते लालू प्रसाद यादव यांची पत्नी राबडी देवी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कथित जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात सोमवारी सीबीआयचं पथक राबडी देवी यांच्या घरी पोहोचलं आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून राबडी देवी यांची चौकशी सुरू आहे. (Latest Marathi News)

बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबरी देवी यांची सीबीआयचं पथक घरी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सध्या राबरी यांच्यासोबत घटनास्थळी तेज प्रताप यादव देखील उपस्थित आहेत. तसेच एक वकिलांचं पथक देखील राबरी देवी यांच्या घरी पोहोचलं आहे.

काय आहे आरोप?

सीबीआयचा आरोप आहे की, लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना मोठ्या प्रमाणात रेल्वेत नोकरी देण्याच्या नावाखाली घोटाळ्या झाल्याचा आरोप केला आहे. आरोपानुसार, विना जाहिराती 'ग्रुप डी'मध्ये १२ लोकांना नोकरी देण्यात आल्याचा आरोपात म्हटलं आहे. तसेच नोकऱ्यांच्या बदल्यात जमिनी घेतल्याचा आरोप आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना अर्जदारांना तात्पुरत्या स्वरुपात रेल्वेत नोकरी दिली जायची. त्यानंतर सौदा संपूर्ण झाल्यानंतर नोकरीवर कायम केलं जायचं असा आरोप आहे.

एफआयरमध्ये काय आहे?

सीबीआयने (CBI) दाखल केलेल्या एफआयआरमध्ये जमिनीच्या बदल्यात नोकरी मिळवणाऱ्या अर्जदारांचे नावे नमूद आहेत. राजकुमार, धर्मेंद्र राय, रवींद्र राय, अभिषेक कुमार, दिलचंद कुमार, मिथिलेश कुमार, अजय कुमार, संजय राय, प्रेमचंद कुमार, लालचंद कुमार, हृदयानंद चौधरी और पिंटू कुमार अशी नोकरी मिळविलेल्य अर्जदारांची नावे आहेत.

rabri devi
क्रूरतेचा कळस! मुलीशी आधी Instagramवर मैत्री, त्यानंतर अत्याचार, मारहाण आणि ब्लेडने शरीरावर...

आरोप आहे की, अर्जदारांकडून जमीन घेऊन लालू प्रसाद यांनी ती पत्नी राबरी देवी, मुलगी मीसा आणि हेमा यादव यांच्या नावावर हस्तांतरित केल्यानंतर काही लाखो रुपये देखील देण्याचा आरोप आहे.

दरम्यान, सीबीआयने ऑक्टोबर २०२२ मध्ये माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या व्यतिरिक्त १४ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. त्याचदरम्यान, सीबीआयने छापेमारी देखील केली होती. सीबीआयने १३ सप्टेंबर २०२१ पासून जमिनीच्या बदल्यात नोकरी प्रकरणाचा तपास सुरूवात केला होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com