अरे बापरे! इंजिनिअरच्या घरात सापडलं कोट्यावधीचं घबाड; नोटा मोजताना ED अधिकारीही दमले!

ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका इंजिनिअरच्या घरावर छापेमारी केली.
ED Action in Bihar
ED Action in BiharANI Tweeter

पटना: गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात ईडी (ED) कारवायांना वेग आलाय. अनेक नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर ईडीकडून छापेमारी केली जात आहे. अशातच अजय देवगनच्या रेड चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल, असा सीन बिहारमध्ये (Bihar) पाहायला मिळाला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका इंजिनिअरच्या घरावर छापेमारी केली. या छापेमारी इतकं घबाड सापडलं की, पैसे मोजता-मोजता ईडीच्या अधिकाऱ्यांनाही घाम फुटला. (ED Action Latest News)

ED Action in Bihar
Karuna Munde : करुणा मुंडेंना त्यांच्याच कार्यकर्त्यांनी लावला 30 लाखांचा चुना; तिघांवर गुन्हा

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बिहारमधील ग्रामीण बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या घरावर ईडीने शनिवारी छापेमारी केली. या छापेमारीत ईडीच्या हाती कोट्यावधी रुपयांचं घबाड लागलं. पैशांच्या बंडलांची संख्या इतकी होती. की, संपूर्ण पैसे मोजताना ईडी अधिकाऱ्यांना घाम फुटला. शेवटी पैसे मोजण्यासाठी मशीन मागवावे लागले.

संजय कुमार राय यांच्या घरात ईडीला हे घबाड सापडलं आहे. संजयकुमार राय हे किशनगंज आणि पाटणा इथे बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. प्राप्त माहितीनुसार, संजयकुमार यांच्या घरातून सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या नोटांची मोजणी सुरू आहे. (ED Action Todays News)

दरम्यान, संजय कुमार राय यांच्या घरात एकूण किती रक्कम सापडली याबाबतची अधिकृत आकडेवारी अजून येणं बाकी आहे. या धाडसत्रामध्ये त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची देखील चौकशी आणि त्यांच्या घराची झडती घेण्याचं काम सुरू आहे. अजूनही छापेमारी सुरू असून अवैध रक्कम किंवा दागिने मिळतात का? हे अधिकारी तपासत आहेत.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com