
सीतामढी : धुमधडाक्यात लग्नाची तयारी झाली. डीजेच्या तालावर थिरकत वऱ्हाडी मंडळी मंडपात पोहचले. पंडितजींनी मंगलअष्टक म्हणण्यास सुरूवात केली आणि लग्न लागलं. दरम्यान, नवरीने वरमाला घालताच नवरदेव स्टेजवरच बेशुद्ध होऊन पडला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने उपचासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)
काळजाचा ठोका चुकवणारी ही दुर्देवी घटना बिहारच्या सीतामढी परिसरातील एका गावात घडली. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. सुरेंद्र कुमार असं मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. तो रेल्वेमध्ये ग्रुप-डी म्हणजेच ट्रेन ड्रायव्हरची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याच्या अशा अकाली जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबीयांवर आणि नववधूवर काळाने घाला घातला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र कुमार याचा सीतामढी येथील एका गावातील तरुणीसोबत विवाह (Wedding) ठरला होता. बुधवारी त्याची वरात वाजत गाजत गावात आली. आपल्या लाडक्या मुलाचे लग्न असल्याने सुरेंद्र कुमार याचे कुटुंबीय आनंदात होते. त्यांनी वरातीसाठी डीजे लावला होता.
दरम्यान, सुरेंद्र कुमार आणि त्याचे मित्र डीजेच्या तालावर थिरकत लग्नमंडपात पोहचले. नवरदेव आणि नवरी स्टेजवर पोहचल्यानंतर पंडितजींनी मंगलअष्टक म्हणण्यास सुरूवात केली आणि लग्न लागलं. मात्र, नवरीने वरमाला घालताच सुरेंद्र कुमारला अस्वस्थ वाटू लागलं आणि तो चक्कर येऊन थेट स्टेजवर कोसळला.
भर मंडपातच नवरदेव स्टेजवर कोसळल्याने लग्नमंडपात मोठा गोंधळ निर्माण झाला. वऱ्हाडी मंडळींनी सुरेंद्रकुमारला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, सुरेंद्र कुमार याचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
लग्नात डीजेचा आवाज जास्त असल्याने सीताकुमार याला हार्ट अटॅक आला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. या वेदनादायक घटनेमुळे दोन्ही कुटुंबातच नाही तर संपूर्ण गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. इथे दोन्ही कुटुंबात यामुळे कलह निर्माण झाला आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.