
Bihar News : बिहारमध्ये एक अनोखा विवाह पार पडला आहे. येथील दोन तरुणी एकमेकींच्या प्रेमात पडल्या. पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न झाल्यावर सर्वत्र या दोघींच्या विवाहाची जोरदार चर्चा रंगली. मात्र आता या दोन्ही तरुणी गायब असल्याचं म्हटलं जात आहे. दोन्ही तरुणी नेमक्या कुठे गेल्या आणि त्यांच लग्न नेमकं कसं झालं याची माहिती जाणून घेऊ. (Latest Bihar News)
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या डुमरावमध्ये ही घटना घडली आहे. डुमरावच्या डुमरेजानी या मंदिरात दोन्ही तरुणींचा विवाह सोहळा पार पडला. अमिषा आणि पायल अशी या दोघींची नावं आहेत. या दोन्ही तरुणी गेल्या तीन वर्षांपासून एकमेकींना ओळखत होत्या. त्या दोघी एका ऑर्केस्ट्रा पार्टीत डान्सरचं काम करत होत्या. सुरूवातीला त्यांच्यात मैत्री झाली. पुढे हीच मैत्री प्रेमात बदलली गेली. त्यामुळे पुढे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघींनी लग्न केले तेव्हा ऑक्रेस्ट्रा पार्टीतील सर्व व्यक्ती उपस्थित होत्या. या दोघींनी त्यांनी घेतलेला निर्णय कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे का हे तपासले. त्यानंतर त्यांनी मंदिरात सप्तपदी घेत एकमेकींचा पती पत्नी म्हणून स्विकार केला. अमिषा आणि पायल या दोघींपैकी अमिषा ही पती आहे तर पायल पत्नी आहे. अमिषाला लहान असतानापासून तिच्यातील या बदलाची माहिती होती. तिला नेहमीच मुलींकडे आकर्षण होतं. त्यामुळे काम करताना तिला पायल आवडली आणि दोघींनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर दोन्ही तरुणी गायब
मंदिरात देवाच्या साक्षीने त्यांनी लग्न केलं. या लग्नाआधी दोघींनीही आपल्या कुटुंबियांची परवानगी घेतली होती. अमिषाच्या घरी हे समजल्यावर तिच्या कुटुंबियांनी या नात्याला परवानगी दिली होती. मात्र पायलचे कुटुंबिय या नात्याच्या विरोधात होते. आपल्या मुलीने असं करणं त्यांना मान्य नव्हतं. एकाच ऑक्रेस्ट्रामध्ये डान्सरचं काम करत त्या एकमेकींच्या प्रेमात पडल्या. मात्र त्या आता कुठे आहेत हे माहीत नसल्याचं ऑक्रेस्ट्रामधील व्यक्ती म्हणत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.