Bihar Crime: अवघ्या ४०० रुपयांच्या वादातून भयंकर हत्याकांड... ५० राऊंड फायर; अंधाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू

Bihar Patna Crime News: दुधाच्या ४०० रुपयांच्या उधारीवरुन दोन गटात झालेल्या वादात तिघांचा मृत्यू झाला आहे.
Bihar Patna Crime News
Bihar Patna Crime NewsSaamtv

Bihar Crime News:

बिहारमधून (Bihar) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बिहारच्या पाटणा जिल्ह्यात दुधाच्या ४०० रुपयांच्या उधारीवरुन दोन गटात झालेल्या वादात तिघांचा मृत्यू झाला आहे. फतुहा ठाण्यांतर्गत सुरगापर भागातील हे संपूर्ण प्रकरण आहे.

गुरुवारी रात्री १० वाजता पैसे मागण्यासाठी आल्याने दोन गटात प्रथम शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर अचानक दोन्ही गटांकडून गोळीबार सुरु झाला. ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. (Crime News In Marathi)

Bihar Patna Crime News
Nandurbar News : परिवारातच कोट्यावधीचा निधी; आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाटणा जिल्ह्यातील (Patna) फतुहा ठाणे क्षेत्रात सुरगापर दुधाच्या थकीत रकमेवरुन दोन गटात वाद झाला. या थकबाकीच्या मुद्द्यावरून पंचायत भरणार होती. ज्यात चर्चेतून वाद मिटवण्याचा प्रयत्न होणार होता. पण, त्यापूर्वीच दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला आणि ही घटना घडली, असे ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितले.

या वादाचे रुपांतर गोळीबारात होवून दोन्ही गटाकडून एकमेकांवर हल्ला करण्यात आला. ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. प्रदीप कुमार(३५), शैलेश कुमार(४०) आणि जय सिंह(५०) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच डीएसपी सियाराम यादव पोलीस बळासोबत घटनास्थळी पोहचले आणि चौकशीला सुरवात केली. चौकशीत प्रदीप कुमार व जय सिंह हे आपापल्या गटाचे प्रमुख होते असे समोर आले आहे. पोलीस तपासात ४०० रुपयांच्या पैशाच्या वादासह जमिनीचा वादही असल्याचे सांगण्यात येत आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक रुग्णालयात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. ग्रामस्थांचा पोस्टमॉर्टेमसाठी विरोध होता जो पोलिसांनी समज दिल्यावर मावळला. यानंतर पोस्टरमोर्टेमसाठी तिन्ही मृतदेह नालंदा वैद्यकीय महाविद्यालयाला पाठवले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Bihar Patna Crime News
Andhra Pradesh Accident: तिरुपती बालाजीहून परतताना भीषण अपघात... ट्रकची क्रूझरला धडक; ५ जणांचा मृत्यू

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com