
पटना: उच्च शिक्षण घेतल्यानंतर एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी करावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, उच्च शिक्षण घेऊन छोटा समजला जाणारा एखादा व्यवसाय केला तर, काही लोकं त्यालाही नावं ठेवतात. मात्र या कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता एका तरुणीने चहा विक्रीचा (Start Tea Business) व्यवसाय सुरू केला. ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. प्रियंका गुप्ता असं या तरुणीचं नाव असून तिने एमबीएपर्यंत (MBA) शिक्षण पूर्ण केलंय, पंतप्रधान मोदींकडूनच (PM Narendra Modi) आपल्याला या व्यवसायाची प्रेरणा मिळाली असं प्रियंका सांगते.
बिहारच्या पटना शहरात राहणाऱ्या प्रियंका गुप्ता या तरुणीने एममबीए पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणानंतर नोकरदार न होता व्यवसाय करून जगायचे, असा तिचा माणस होता. म्हणून प्रियंकाने नोकरीच्या मागे न लागता चहाचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये तिला तिच्या कुटुंबियांनी सुद्धा साथ दिली. त्यानंतर प्रियंकाने पटना येथील एका महाविद्यालयाच्या परिसरात चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला. चहा विक्रीचा हा व्यवसाय आता प्रियंकाची ओळख बनला आहे. तिला सोशल मीडियावर 'पदवीधर चहा वाली' (Graduate Chai Wali) म्हणून प्रसिद्धी मिळत आहे.
चहा विक्रीसाठी कुणाचाही दबाव नाही
महाविद्यालयासमोर चहाचा व्यवसाय सुरू करणारी प्रियंका एका श्रीमंत कुटुंबातून येते. प्रियंकाने बोलताना सांगितलं की, तिने कुणाच्याही दबावाखाली येऊन चहाचा व्यवसाय सुरू केला नाही. तिचे कुटुंबिय पूर्वीपासूनच व्यावसायिक आहे. म्हणून तिनेही व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. प्रियंका सांगते की, तिला सुरूवातीपासूनच व्यावसायिक बनण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने कधीही नोकरीचा विचार केला नाही. मात्र, नेमका कोणता व्यवसाय सुरू करायचा असा प्रश्न तिला पडत होता.
पंतप्रधान मोदींकडून मिळाली प्रेरणा
व्यवसाय करायची कल्पना कशी सूचली असा प्रश्न प्रियंकाला विचारला असता, या प्रश्नाला उत्तर देताना प्रियंका म्हणाली की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनच मला व्यवसायाची कल्पना सूचली. प्रत्येकाने आत्मनिर्भर बनलं पाहिजे असं मोदींनी म्हटलं होतं. त्यांच्या याच गोष्टींची मी प्रेरणा घेतली". नोकरदार होण्यापेक्षा आपण स्वत: हून व्यवसाय सुरू करायचा आणि इतरांना रोजगार द्यायचा असं प्रियंकाचा मानस आहे. त्यासाठी तिला येत्या काही दिवसात पटना शहरातील इतरही ठिकाणी चहाचा व्यवसाय सुरू करायचा आहे.
दरम्यान, प्रियंकाची प्रेरणादायक कहाणी ऐकून तिचा संघर्ष पाहण्यासाठी आलेल्या एका जोडप्याने सांगितलं की, एक सुशिक्षित मुलगी जी चांगली नोकरी करू शकते तिला आज चहा विकावा लागतो, हे बिहार आणि केंद्र सरकारचे अपयश आहे. सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.