चिंताजनक! बर्ड फ्लूने भारतात पहिल्या मृत्यूची नोंद

देशात मंगळवारी बर्ड फ्लूमुळे झालेल्या, पहिल्या मृत्यची नोंद झाली आहे.
चिंताजनक! बर्ड फ्लूने भारतात पहिल्या मृत्यूची नोंद
चिंताजनक! बर्ड फ्लूने भारतात पहिल्या मृत्यूची नोंदSaam Tv

नवी दिल्ली : देशात मंगळवारी बर्ड फ्लूमुळे Bird flu झालेल्या, पहिल्या मृत्यची नोंद झाली आहे. मंगळवारी दिल्ली Delhi मधील एम्समध्ये एका ११ वर्षीय मुलाचा एच ५ एन १ एवियन इन्फ्लूएंजाने मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. हॉस्पिटल मधील एका अधिकाऱ्याच्या सांगितलेल्या माहितीनुसार, मुलाच्या संपर्कात मध्ये आलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना employees विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे.

हे देखील पहा-

यावर्षी जानेवारीमध्ये काही राज्यांत states बर्ड फ्लूमुळे पक्षी मरत असल्याची माहिती समोर आली होती. या मध्ये कावळे Crows, कोंबड्या व इतर पक्षांचा समावेश आहे. पक्ष्यांच्या या मृत्यूने प्रशासन सक्रिय झाले आणि मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. केरळ Kerala, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश Himachal Pradesh आणि महाराष्ट्रात बर्ड फ्लूची प्रकरणे आढळल्याने हाय अलर्ट देण्यात आले आहे.

चिंताजनक! बर्ड फ्लूने भारतात पहिल्या मृत्यूची नोंद
बर्ड फ्ल्यूमुळे पोल्ट्रीफार्म चालकांचं प्रचंड नुकसान, नेमकं काय आहे यामागचं कारण? वाचा सविस्तर...

बर्ड फ्लूचे संक्रमन जिवंत अथवा मृत कोंबडीच्या थेट संपर्कात आल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे व्यवस्थितपणे शिजवून खालेले अन्न अधिक सुरक्षित आहे. माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग Infection झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेलाही दिली गेली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com