बापरे! 8 पायांच्या शेळीचे जन्म, पण पाच मिनिटांत भलतंच घडलं

पण पाच मिनिटांत भलतंच घडलं
बापरे! 8 पायांच्या शेळीचे जन्म, पण पाच मिनिटांत भलतंच घडलं
बापरे! 8 पायांच्या शेळीचे जन्म, पण पाच मिनिटांत भलतंच घडलं Saam Tv

बानगाव : एका शेळीने Goat ८ पाय आणि २ कूल्हे असणाऱ्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. या शेळीच्या पिल्लाचे फोटो Photo सोशल मीडियावर Social media प्रचंड वेगाने व्हायरल Viral होतं असताना दिसून आले आहे. याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. १६ जुलै दिवशी सरस्वती मोंडल या महिलेच्या शेळीने या आश्चर्यकारक पिल्लाला जन्म दिले आहे.

शेळीने तब्ब्ल ८ पायाच्या पिल्लाला जन्म दिल्याची माहिती गावामध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरत होती. यानंतर गावामधील अनेकांनी या शेळीच्या पिल्लाला बघण्यासाठी मोंडल यांच्या घरी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या शेळीच्या पिल्लाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाले आहेत.टाइम्स नाऊ न्युजने सांगितलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना ही पश्चिम बंगालच्या Bengal कालमेघा Kalmegha परिसरामधील बनगाव Bangaon या ठिकाणची आहे.

हे देखील पहा-

बनगाव या ठिकाणी रहिवासी असणाऱ्या सरस्वती मोंडल यांनी घरी काही गायी Cow व शेळींचे पालन करतात. दरम्यान १६ जुलै दिवशी मोंडल यांच्या एका शेळीने २ पिल्लांना जन्म दिले होते. त्यामध्ये १ पिल्लू सामन्य होते, तर २ पिल्लाला ८ पाय व २ कूल्हे होते. ८ पाय व २ कूल्हे असणाऱ्या या शेळीच्या पिल्लाला बघून मोंडलही घाबरुन गेले होते. दुर्दैव गोष्ट म्हणजे, जन्मानंतर काही मिनिटांमध्ये संबंधित शेळीच्या पिल्लाचा मृत्यू देखील झाला आहे.

त्याअगोदर मोंडल यांच्या शेळीने ८ पायांच्या पिल्लाला जन्म दिल्याची बातमी मात्र, गावामध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली गेली. यामुळे गावामधील अनेक लोकांनी मोंडल यांच्या घरी शेळीच्या पिल्लाला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामध्ये काही जणांनी या शेळीच्या पिल्लाचे फोटो देखील काढले आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असताना दिसून येत आहेत.

बापरे! 8 पायांच्या शेळीचे जन्म, पण पाच मिनिटांत भलतंच घडलं
महिलेनं दिला एकाच वेळी 5 बालकांना जन्म

सरस्वती मोंडल यांना याबाबत विचारले, असता त्यांनी इंडिया टुडेला याबद्दल माहिती दिली की, ८ पायांच्या पिल्लाला शेळीने जन्म दिल्याची खळबळजनक घटना मी पहिल्यांदाच बघत आहे. याचे मलाही आश्चर्य वाटत आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, ८ पायांच्या पिल्लाचा जन्मानंतर अवघ्या ५ मिनिटांत त्या पिलांचा मृत्यू झाला आहे. पण शेळीचे दुसरे पिल्लू आणि शेळी दोघेही सुखरुप आहेत.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com