पाच पैशाची बिर्याणी पडली महागात! मालकाच्या अंगलट आली आयडिया

एका हॉटेल मालकाला एक आयडिया सुचली, पण ती एवढी अंगलट आली की त्याचा चांगलाच दम निघाला आहे. परंतु पुन्हा तो अशा आयडिया सोडा, ऑफरही देण्याचा विचार सुद्धा करणार नाही.
पाच पैशाची बिर्याणी पडली महागात! मालकाच्या अंगलट आली आयडिया
पाच पैशाची बिर्याणी पडली महागात! मालकाच्या अंगलट आली आयडियाSaam Tv

चेन्नई : एका हॉटेल Hotel मालकाला एक आयडिया सुचली, पण ती एवढी अंगलट आली की त्याचा चांगलाच दम निघाला आहे. परंतु पुन्हा तो अशा आयडिया सोडा, ऑफरही देण्याचा विचार सुद्धा करणार नाही.

हा सर्व प्रकार तामिळनाडूच्या Tamilnadu चेन्नईतील Chennai आहे. एका नागरिकाने सुकन्या बिर्याणी नावाचा हॉटेल व्ययसाय सुरु केला. त्याने या हॉटेलच्या जाहिरातीसाठी एक भन्नाट ऑफर सुचली. आयडिया म्हणजे अशी की, कोणीही ५ पैशांचे नाणे घेऊन यायचे आणि त्याला बिर्याणी दिली जायचे. परंतु तेव्हा त्याला याच्या परिणामांचा अंदाज नव्हता !

हे देखील पहा-

ते बिर्याणीचे हॉटेल चेन्नईच्या सेल्लू भागात आहे. पाच पैशांत बिर्याणी Biryani मिळणार अशी बातमी पसरली. ही बातमी ऐकून घरात मिळेल तिथून, आजुबाजुच्यांकडून लोकांकडून मागून ५ पैशांची नाणी जमा झाली. आणि या मुळे एवढी गर्दी गोळा झाली की रांग काही कमी होयच नाव घेईना. या सर्व प्रकारात एक वेळ अशी आली कि रांगेत चक्क 300 लोक उभे होते. रांग संपत नव्हती गोंधळ सुरु होता. शेवटी मालकाने हॉटेलचे शटरच खाली केले.

पाच पैशाची बिर्याणी पडली महागात! मालकाच्या अंगलट आली आयडिया
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात; दोन विमानांची टक्कर!

5 पैशांत बिर्याणी म्हणजे मोफत मिळाल्यासारखी आहे. यामुळे लोकांना कोरोनाचाही विसर पडला. तिथे ना मास्क होता, ना सोशल डिस्टन्स पाळला जात होता. फक्त सर्वांच्या हातात 5 पैशांचे नाणे दिसत होते. जेव्हा पूर्ण बिर्याणी संपली तेव्हा पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी या गर्दीला नीट केले. काहीनी तर ५ पैशांचे नाणे दिली आणि तरीसुद्धा आपल्याला बिर्याणी मिळाली नाही अशी तक्रार बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांकडे केली आहे.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com