देशातील पाच ठिकाणच्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का

पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शत्रुघ्न सिन्हा यांनी ३ लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.
BJP
BJP Saam Tv

नवी दिल्ली: देशातील एक लोकसभा आणि चार विधानसभेच्या जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. पाच जागांपैकी एकही जागा भाजपच्या खात्यात आली नाही. पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत टीएमसीचे शत्रुघ्न सिन्हा यांनी सुमारे ३ लाख मतांनी विजय मिळवला. त्यांनी भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांचा पराभव केला. पश्चिम बंगालमधील बालीगंगे विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही टीएमसीने बाजी मारली आहे.

बिहारमध्ये बोचाहान विधानसभा मतदारसंघातून आरजेडीचे उमेदवार अमर पासवान विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या बेबी कुमारी यांचा ३६,७६३ मतांनी पराभव केला. महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला.

BJP
कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीच्या निकालावर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातील खैरागड विधानसभा मतदारसंघातून राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या उमेदवाराने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा २० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे (TMC) शत्रुघ्न सिन्हा यांनी ३ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. आसनसोल लोकसभा मतदारसंघात टीएमसीने पहिल्यांदाच विजय मिळवला आहे. या विजयाने भाजपला मोठा झटका बसला आहे. या मतदार संघात २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे बाबुल सुप्रियो विजयी झाले होते.

BJP
पुण्यात राज ठाकरे यांच्याहस्ते 'हनुमान चालिसा'चे होणार पठण

या विजयानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी विजयाचे श्रेय ममता बॅनर्जी यांना दिले आहे. विजयाचे श्रेय येथील जनतेला आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना जाते. आमच्या कार्यकर्त्यांनी या विजयासाठी प्रयत्न केले असल्याचे सिन्हा म्हणाले. 'ममता बॅनर्जी यांच्या सूचनेवरुन आणि आसनसोलच्या जनतेच्या आदेशाने मी येथे आलो आणि आता या लोकांच्या प्रेमापुढे नतमस्तक होतं आहे, असंही सिन्हा म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com