भाजप नेत्याला अटकेच्या प्रकरणात नवीन ट्विस्ट, पंजाब पोलिसांवर अपहरणाचा गुन्हा दाखल

भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांच्या अटकेच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला
भाजप नेत्याला अटकेच्या प्रकरणात नवीन ट्विस्ट, पंजाब पोलिसांवर अपहरणाचा गुन्हा दाखल
Tajinder Singh Bagga ArrestSaam Tv

पंजाब : भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांच्या अटकेच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पंजाब (Punjab) पोलिसांविरुद्ध दिल्लीत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी एफआयआर (FIR) नोंदवला आहे. बग्गा याला अटक (Arrest ) केलेल्या पोलीस (police) अधिकाऱ्यांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तजिंदर सिंग बग्गा यांच्या वडिलांनी पंजाब (Punjab) पोलिसांविरुद्ध दिल्लीच्या जनकपुरी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

हे देखील पाहा-

तजिंदरसिंग बग्गा यांच्या वडिलांनी आरोप (Allegations) केला आहे, की पंजाब पोलिसांनी त्यांच्या मुलाला जबरदस्तीने घरातून नेले आणि मारहाण केली. पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवताना त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ताही उपस्थित होते. तजिंदर सिंग बग्गा यांनी पंजाब पोलिसांच्या एफआयआरविरोधात पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्याची सुनावणी उद्या म्हणजेच होणार होती. मात्र न्यायाधीश रजेवर गेले. बग्गा यांच्या अटकेविरोधात भाजप आज दुपारी ३ वाजता आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे.

Tajinder Singh Bagga Arrest
अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर हा मूलभूत अधिकार नाही; हायकोर्टाची टिप्पणी

पंजाब पोलिसांनी भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांना आज अटक केली. विशेष म्हणजे, मोहाली पोलिसांनी तजिंदर सिंग बग्गाविरुद्ध सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल केला होता. कलम १५३-अ, ५०५ आणि ५०६ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ एप्रिल २०२२ दिवशी मोहाली येथे नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे पंजाब पोलिसांनी बग्गा यांच्यावर ही कारवाई केली आहे. पंजाब पोलिसांनी आम आदमी पार्टीचे प्रवक्ते सनी सिंग अहलुवालिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. सनी सिंग अहलुवालियाच्या तक्रारीनुसार, तजिंदर सिंग बग्गा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकांच्या धार्मिक भावना भडकावून मुख्यमंत्री केजरीवाल यांना इजा पोहोचवू शकतात आणि त्याचवेळी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.