
पंजाब: पंजाब पोलिसांनी आज भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांना दिल्लीतून (Delhi) अटक करण्यात आली आहे. पंजाब (Punjab) पोलिसांच्या या कारवाईवर भाजप (BJP) नेते कपिल मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट केले की, 'ताजिंदर बग्गा यांना पंजाब पोलिसांच्या (Police) ५० कर्मचाऱ्यांनी अटक (arrested) करून, त्यांच्या घरातून नेले आहे. तजिंदर बग्गा हा खरा सरदार आहे, त्याला अशा कृत्यांमुळे घाबरवले जाऊ शकत नाही किंवा कमकुवत केलं जाऊ शकत नाही. खर्या सरदाराची इतकी भीती का?
हे देखील पाहा-
कपिल मिश्रा यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हा आरोप केला
आपल्या पुढच्या ट्विटमध्ये कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करत म्हणाले की, 'केजरीवाल यांची वैयक्तिक नाराजी, वैयक्तिक दुःख हाताळण्यासाठी पंजाब पोलिसांचा वापर केला जात आहे. हा पंजाबचा, पंजाबच्या जनादेशाचा अपमान आहे. आज संपूर्ण देश तजिंदर बग्गा यांच्या पाठीशी उभा आहे. केजरीवाल खऱ्या सरदाराला घाबरले आहेत.
आणखी एका ट्विटमध्ये कपिल मिश्राने तजिंदर सिंग बग्गा यांच्यावर वडिलांना मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. त्यांनी ट्विट केले की, 'तजिंदर बग्गा यांच्या वृद्ध वडिलांनाही मारहाण करण्यात आली. त्याच्या तोंडावर ठोसे मारण्यात आले आहेत. पोलिसांच्या गणवेशातील हे गुंड पाठवले आहेत का? ही अटक की आहे की अपहरण?
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटले आहे की अरविंद केजरीवाल यांनी तजिंदर सिंग बग्गा यांना शांत करण्यासाठी आपल्या पोलीस बळाचा वापर केला आहे. अशी कोणतीही कारवाई करू नये, असे न्यायालयाने आधीच सांगितले असतानाही ५० पेक्षा जास्त पोलीस त्याच्या घरात घुसले होते. तपास नुकताच सुरू झाला होता. भारताच्या इतिहासात सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी पोलिसांचा अशा प्रकारे वापर केला गेला नाही.
पंजाबची कायदा आणि सुव्यवस्था सोडून दिल्लीतील लोकांना अटक करण्यासाठी पंजाबचे पोलीस तैनात करण्यात आल्याचे दिसत आहे. ते पुढे म्हणाले की, पंजाब पोलीस दिल्लीत ठिकठिकाणी फिरत आहेत. तजिंदरसिंग बग्गा हा शूर आणि सच्चा सरदार आहे. केजरीवाल खऱ्या सरदाराला घाबरतात. केजरीवाल यांच्याकडे पोलीस येऊन १ महिना ही झाला नाही आणि कार्यकर्त्यांना उचलले जात आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.