Mithun Chakraborty : तृणमूलचे 38 आमदार आमच्या संपर्कात; भाजप नेते मिथुन चक्रवर्तींचा दावा

मिथुन चक्रवर्तीच्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
BJP Mithun Chakraborty
BJP Mithun ChakrabortyANI

कोलकाता : एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्रीय तपास यंत्रणांवरून भाजपवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे आता भाजपने ममता यांना मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल कॉंग्रेसचे तब्बल 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. इतकंच नाही तर, यातील 21 आमदार स्वत: माझ्या संपर्कात असल्याचं मिथून चक्रवर्तींनी स्पष्ट केलंय.

BJP Mithun Chakraborty
Mamata Banerjee : महाराष्ट्रावर कब्जा केला, पण पश्चिम बंगाल...; ममता बॅनर्जींचे भाजपला चॅलेंज

मिथून चक्रवर्ती यांनी एका पत्रकार परिषदेत हा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी भाजपने एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केलीये. त्यामुळे आता महाराष्ट्रापाठोपाठ भाजप आता पश्चिम बंगालची सत्ताही काबीज करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

तृणमूल काँग्रेसचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे. यासोबतच 38 पैकी 21 आमदार आपल्या थेट संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. मिथुन चक्रवर्तीच्या या दाव्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, असं असलं तरी, तृणमूल कॉंग्रेसच्या एकाही नेत्याने याबाबत आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. तृणमूल काँग्रेस मिथुन चक्रवर्तींच्या या दाव्यांचे खंडन करेल, असे मानले जात आहे.

BJP Mithun Chakraborty
दुर्देवी घटना! चालकाचं नियंत्रण सुटलं अन् प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली!

मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, 2021 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने लोकांची सहानुभूती मिळवून निवडणूक जिंकली आहे. अशा परिस्थितीत बळजबरीने हिसकावून घेतलेल्या गोष्टी हाताळणे कठीण असते अशी एक म्हण हिंदीत आहे. असं मिथून चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे. यासोबतच विधानसभेच्या निवडणुका पुन्हा झाल्या तर भाजपचा नक्कीच विजय होईल. असंही चक्रवर्ती म्हणाले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भाजपला चॅलेंज

दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला. भाजप २०२४ मध्ये सत्तेत येणार नाही हे निश्चित आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपकडे काही काम नाही. तीन-चार एजन्सींच्या माध्यमातून राज्य सरकार आपल्या ताब्यात घेणे एवढेच त्यांचे काम आहे, अशा शब्दांत त्यांनी घणाघात केला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांनी महाराष्ट्रावर कब्जा केला. आता झारखंड ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पश्चिम बंगाल त्यांचा पराभव करेल. बंगालला तोडणे त्यांना शक्य नाही. कारण या ठिकाणी त्यांना आधी रॉयल बंगाल टायगरशी लढावं लागेल, असं आव्हानही ममता यांनी भाजपला दिलं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com