BJP Manifesto Karnataka: दरवर्षी तीन 'गॅस सिलिंडर' आणि दररोज मोफत 'दूध' देणार; कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा

दरवर्षी तीन 'गॅस सिलिंडर' आणि दररोज मोफत 'दूध' देणार; कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा
BJP Manifesto Karnataka
BJP Manifesto KarnatakaSaam TV

BJP Manifesto Karnataka: भारतीय जनता पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. आपल्या जाहीरनाम्यात भाजपने मोफत गॅस सिलिंडर देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

यात भाजपने समान नागरी संहिता आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्याची घोषणा केली आहे. भाजप याला 'जनतेचा जाहीरनामा' म्हणत आहे. कर्नाटकात 10 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. 13 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

BJP Manifesto Karnataka
Nana Patole News: 'आम्हाला फरक पडत नाही, सगळे प्लॅन तयार...' कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा?

BJP Manifesto Karnataka: जाहीरनाम्यात काय आहे?

राज्यात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याचे आश्वासन भाजपने (BJP) दिले आहे. यासोबतच पक्षाने सत्तेत परतल्यावर एनआरसी लागू करण्याची घोषणाही केली आहे. (Latest Marathi News)

भाजपने उगादी, दिवाळी आणि गणेश चतुर्थीला दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच बीपीएल कार्डधारकांना दररोज मोफत दूध देणार असल्याचं भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

BJP Manifesto Karnataka
Raj Thackeray News: "...हेच फक्त माझं स्वप्न आहे"; महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची खास पोस्ट

पुन्हा सरकार स्थापन करण्यात यश मिळाल्यास बेंगळुरूचा राजधानीचा प्रदेश म्हणून विकास केला जाईल, असे आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. 6 लाखांहून अधिक लोकांच्या सूचना घेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती भाजपने दिली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये विस्ताराच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

BJP Manifesto Karnataka: जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे

  • कर्नाटकात एकसमान आचारसंहिता

  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध

  • कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दर महिन्याला 5 किलो तांदूळ आणि 5 किलो बाजरी

  • उगादी, गणेश चतुर्थी आणि दिवाळीला बीपीएल कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर

  • कर्नाटक ओनरशिप कायद्यात सुधारणा

  • प्रत्येक वॉर्डात लॅब

  • म्हैसूरमधील फिल्म सिटीला दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांचे नाव देण्यात येणार

  • अटल आहार केंद्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com