
BJP Master Stroke For Upcoming Elections Latest Update : भारतीय जनता पक्षाने (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसह २०२४ मध्ये होणाऱ्या निवडणुकांचीही तयारी केली आहे. भाजपने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी मास्टरस्ट्रोक प्लान तयार केला आहे. पक्षाची योजना यशस्वी ठरली तर, ९ राज्यांच्या विधानसभेच्या आगामी निवडणुका आणि २०२४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधकांचा पराभव निश्चित आहे, असे बोलले जात आहे.
दिल्लीनंतर गुजरातमध्ये भाजपने (BJP) राज्याच्या कार्यकारिणीची बैठक बोलावून तेथील नेत्यांना निवडणूक (Elections) 'लक्ष्य' दिलं आहे, यावरून भाजप निवडणुकांच्या बाबतीत किती गंभीर आहे हे दिसून येतं. गुजरातमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) विक्रमी विजय मिळाल्यानंतर जल्लोष करण्याऐवजी पक्षाने आगामी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे.
गुजरात हे एकमेव राज्य आहे, जिथे गेल्या सात निवडणुकांमध्ये भाजपला सलग विजय मिळाला आहे, त्यामुळे जेव्हा निवडणुका येतात, तेव्हा या राज्याची वारंवार चर्चा होते. आता गुजरातच्या धर्तीवरच भाजपने आगामी ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)
याच महिन्यात दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर लगेच गुजरातमध्येही बैठक झाली. या बैठकीत भाजपचे जवळपास ७०० नेते सहभागी झाले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था कोणत्या हॉटेलात नाही, तर कार्यकर्त्यांच्या घरी करण्यात आली होती. तर ही बैठक कोणत्या मोठ्या शहरात नव्हे, तर एका जिल्ह्यात करण्यात आली होती. तर भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील हे देखील कार्यकर्त्याच्या घरीत थांबले होते.
प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी आपल्या नेत्यांना थेट आदेश दिल्याचे सांगितले जाते. आगामी लोकसभा निवडणुकीत (loksabha Elections) २६ जागांवर नव्हे, तर मोठ्या फरकाने विजय मिळवला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत एका जागेवरील पराभवही मान्य होणार नाही. विशेष म्हणजे या बैठकीत त्यांनी जे आमदार कमी मतांच्या फरकाने विजयी झाले होते, अशांची जबाबदारी निश्चित केली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीचाही उल्लेख केला, असे सांगितले जाते.
गुजरातमध्ये १५६ जागांवर विजय मिळाला. या ऐतिहासिक विजयामागचं कारण म्हणजे भाजपची सक्रियता असल्याचे सांगितले जाते. भाजप या ठिकाणी ३६५ दिवस निवडणुकांच्या कामात असतो. कार्यकारिणीच्या बैठकीत सीआर पाटील यांनी विजयाच्या जल्लोषाऐवजी पक्षाचे नेते आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी सुनिश्चित केली.
इतकेच नाही तर जबाबदारी सोपवल्यानंतर निश्चिंत होतात, असे नाही. जिल्हा पातळी, मंडल, ब्लॉक, पंचायत स्तरावर दिलेल्या जबाबदारीचा आढावा घेतला जातो. त्यामुळे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात उत्तम संपर्क राहतो.
भारतीय जनता पक्षाच्या या विजयाचा फॉर्म्युला आता प्रत्येक राज्यात राबवताना बघायला मिळणार आहे. भाजपने तशी तयारी केली असून, आगामी ९ राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीत त्याची झलक बघायला मिळू शकते. संघटनात्मक पातळीवर बघितलं गेलं तर, भाजप व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाने अशी तयारी केल्याचे सध्या तरी दिसून येत नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.