
जुन्या ऐतिहासिक संसद भवनात आज शेवटचा दिवस आहे. ७५ वर्षांची संसदीय परंपरा जपलेल्या संसदेतून बाहेर पडण्यापूर्वी तिथे फोटो सेशन पार पडलं. या फोटो सेशनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदारही उपस्थित होते. खासदारांच्या ग्रुप फोटो सेशनदरम्यान भाजप खासदार नरहरी अमीन हे अचानक बेशुद्ध पडले.
गोंधळानंतर फोटो सेशन मधेच थांबवून सगळे त्यांच्या दिशेने धावले. पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी देखील फोटो सेशनमध्ये भाग घेतला. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत महिती दिली आहे. (Latest Marathi News)
नरहरी अमीन हे गुजरातमधील भाजपचे खासदार आहेत. फोटो सेशनमध्ये सहभागी होण्यासाठी ते संसद भवनात उपस्थित होते, मात्र अचानक ते बेशुद्ध झाले. नंतर काही वेळातच त्यांना बरं वाटलं.
फोटो सेशननंतर दोन्ही सभागृहातील खासदार सेंट्रल हॉलमध्ये जमले होते. त्यानंतर सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संसदेच्या नवीन इमारतीत दाखल होतील. गणेश चतुर्थीच्या विशेष मुहूर्तावर आज, १९ सप्टेंबरपासून नवीन संसद भवनात कामकाज सुरू होणार आहे. काल जुन्या संसदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी खूपच भावूक झाले होते.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.