धक्कादायक! फेसबुक पोस्ट लिहून भाजप महिला नेत्याची आत्महत्या

उत्तर प्रदेश येथील बांद्यामध्ये भाजपच्या महिला नेत्याने फेसबुक पोस्ट लिहून आत्महत्या केली
UP Crime
UP CrimeSaam Tv

वृत्तसंस्था: उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) येथील बांद्यामध्ये भाजपच्या महिला नेत्याने फेसबुक पोस्ट (Facebook post) लिहून आत्महत्या केली आहे. गळफास लावून महिला नेत्याने स्वतः चे जीवन संपवले आहे. पत्नीबरोबर झालेल्या वादानंतर नेत्याने टोकाचे पाऊल उचलायची चर्चा सध्या केली जात आहे. महिलेचा पती सध्या फरार आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा त्यांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी (police) महिलेचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. श्वेता सिंह असे भाजप नेत्याचे नाव आहे. मृत्यूच्या २० तासाअगोदर श्वेता यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती.

हे देखील पाहा-

यामध्ये त्यांनी आपल्या डोक्यात सुरू असलेल्या गोष्टीविषयी संकेत दिले होते. श्वेता यांची शेवटची फेसबुक पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे. श्वेता सिंह गौर या बांदातील जसपुरा क्षेत्राहून जिल्हा पंचायतीच्या सदस्या होत्या. माजी आयपीएस (IPS) अधिकारी राजबहादूर सिंह हे श्वेता सिंह यांचे सासरे लागतात. श्वेता सिंह गौर सोशल मीडियावर (Social media) खूप सक्रीय असायचे. श्वेता यांनी त्यांच्या मृत्यूची भविष्यवाणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अगोदरच केली होती. श्वेता सिंह गौर पती दीपक सिंह गौरबरोबर सासऱ्यांच्या घरी राहत असत. पती पत्नी भाजपशी संबंधित आहेत.

UP Crime
भोंग्यांबाबत तत्कालीन पोलीस आयुक्तांनी काढलेले आदेश रद्द

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये खूप दिवसांपासून वाद सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सतत भांडण होत असतं. त्यानंतर श्वेता सिंह यांनी पंख्याला लटकून आत्महत्या केली आहे. आत्महत्येच्या अगोदर श्वेता सिंह यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. घायाळ नागीण आणि वाघीण, अपमानित महिलेला घाबरायला हवं, असे श्वेता सिंह यांनी पोस्टमध्ये सांगितले होते. श्वेता यांच्या आत्महत्येनंतर पती दीपक सिंह फरार आहे. पोलिसांनी श्वेता यांचा मोबाईल जप्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com