
Bengaluru Crime News : कर्नाटकात धक्कादायक घटना घडली आहे. बेंडालुरू जिल्ह्यातील बैयप्पनहल्ली येथे सर एम विश्वेश्वरैया टर्मिनल (SMVT) येथे रेल्वे फलाटावर मंगळवारी एका ड्रममध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेची हत्या करून मृतदेह ड्रममध्ये ठेवून तो रेल्वे स्थानकात ठेवण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे वय अंदाजे ३१ ते ३५ वर्षे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह असलेला ड्रम तिघा जणांनी रिक्षातून आणला होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. (Latest Marathi News)
या घटनेने कर्नाटकात (Karnataka) खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) तपास सुरू केला आहे. ड्रम नेणारे आणि तो रेल्वे स्थानकात (Railway Station) फेकून पसार होणाऱ्या तिघा जणांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेण्यात येत आहे.
रेल्वे पोलीस अधीक्षक सौम्यलता यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, तिघा जणांचा शोध घेण्यात येत आहे.
रेल्वे पोलिसांनी (Railway Police) सांगितले की, मृत महिलेचे वय अंदाजे ३१ ते ३५ वर्षे असावे. तिची ओळख पटवण्यात येत आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. (Crime News)
गेल्या वर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात याच रेल्वे स्थानकावर एका पॅसेंजर ट्रेनच्या डब्यात पिवळ्या रंगाच्या गोणीमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. गोणीतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. याबाबत एका प्रवाशाने तक्रार केली होती. अन्य वस्तूंसह ही गोणीही डब्यात ठेवण्यात आली होती.
४ जानेवारीलाही यशवंतपूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिचा मृतदेह आंध्र प्रदेशच्या मछलीपट्टणममधून आणून रेल्वे स्थानकात फेकण्यात आला होता, असे तपासात समोर आले होते. या तिन्ही घटनांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याबाबत काहीही माहिती कळू शकली नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.