भरधाव टेम्पोची बोलेरोला धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू, आठ जण गंभीर

Madhya Pradesh: जीपमधील प्रवाशी भोले बाबा यांच्या सत्संगमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते
भरधाव टेम्पोची बोलेरोला धडक; ७ जणांचा जागीच मृत्यू, आठ जण गंभीर
Bolero AccidentSaam TV

कासगंज: उत्तरप्रदेशातल्या कासगंज (Kasganj UP) जिल्ह्यातील पटियाली भागात टेम्पो आणि बोलेरो जीपची (Bolero-Tempo Accident) समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तब्बल ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका महिलेसह ६ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की दोनही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातानंतर आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत टेम्पो आणि बोलेरोमध्ये अडकलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

Bolero Accident
गळफास घेतल्‍याच्‍या अवस्‍थेत आढला तरूण; मित्रांनी मारल्‍याचा नातेवाईकांचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी खचाखच भरलेली बोलेरो जीप भरधाव वेगाने कायमगंज येथून बहादुरच्या दिशेने जात होती. या जीपमधील प्रवाशी भोले बाबा यांच्या सत्संगमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते. याचदरम्यान, पटियाली क्षेत्राच्या अशोकपूर मार्गावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने जीपला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, ८ जण गंभीर जखमी झाले. या दोन्ही वाहनांमधून एकूण १८ प्रवाशी प्रवास करत होते.

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातातील एका महिलेसह आठ जण गंभीर जखमींना उपचारासाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तिथून त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. या अपघाताची माहिती सत्संगाला जाणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबियांने घटनास्थळी धाव घेत मोठा आक्रोश केला. या अपघातात टेम्पोमधील महिलांसह ६ तर बोलेरोमधील २ जणांचा मृत्यू झाला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.