Bollywood : अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
सोनू सुदSaam Tv

Bollywood : अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा

कोरोना लॉकडाऊनकाळात अनेक गरजूंना आर्थिक व इतर अन्य प्रकारे मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या मुंबईतील घरावर व कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.

मुंबई: कोरोना लॉकडाऊनकाळात अनेक गरजूंना आर्थिक व इतर अन्य प्रकारे मदत करणारा बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या मुंबईतील घरावर व कार्यालयावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी सोनू सूदच्या कार्यालयाचाही सर्व्हे केला आहे. प्राप्त माहितीनुसार सोनूच्या कार्यालयावर आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून हा छापा टाकण्यात आला होता.

हे देखील पहा :

परंतु, या छापेमारीत अधिकाऱ्यांकडून कोणतीही कागदपत्रे आठव्या अन्य गोष्टी जप्त करण्यात आल्या, नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी आयकर विभागाच्या (Income Tax Department) अधिकाऱ्यांनी सोनू सूदच्या मालमत्तेचा सर्व्हे केला आहे. सोनूशी संबंधित ६ ठिकाणी हा सर्व्हे करण्यात आला आहे. कार्यालयातील अकाऊंट बुकमध्ये अनियमिततेचा आरोप करण्यात आल्यानंतर आयकर विभागानं ही कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे.

सोनू सुद
Ahmednagar | Petrol पंपावर ATM कार्ड वापरत असाल तर हि बातमी नक्कीच वाचा...

आयकर अधिनियम, 1961 कलम 133 A अनुसार सुरू असलेल्या ‘सर्वे अभियानात’ आयकर विभागाचे अधिकारी केवळ व्यावसायिक भाग आणि त्याच्याशी संबंधित भागांची पाहणी करू शकतात. कोरोना काळात अभिनेता सोनू सूदने गोरगरिबांची मोठ्या प्रमाणावर मदत केली. अचानकपणे लॉकडाऊन लागल्यानंतर मजुरांना घरी परतण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था व आर्थिक स्वरूपात केलेल्या मदतीने सोनू सूद चर्चेत आला होता. देशभरातून त्याच्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले होते.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

सोनू सुद
Breaking Beed : पोलीस पतीसह सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवतीची आत्महत्या!
सोनू सुद
Baramati : शेततळ्यात पडून मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू!
सोनू सुद
Gauri Ganpati : चक्क सुनांना बनवलं गौराई!

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com