पाकिस्तानात चिनी इंजिनिअर्सच्या बसवर बॉम्ब हल्ला
पाकिस्तानात चिनी इंजिनिअर्सच्या बसवर बॉम्ब हल्लाSaam Tv

पाकिस्तानात चिनी इंजिनिअर्सच्या बसवर बॉम्ब हल्ला

पाकिस्तान मध्ये चीनच्या इंजिनिअरांना घेऊन जात असलेल्या, बसवर मोठा बॉम्ब हल्ला करण्यात आले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तान Pakistan मध्ये चीनच्या China इंजिनिअरांना घेऊन जात असलेल्या, बसवर मोठा बॉम्ब Bomb हल्ला करण्यात आले आहे. यामध्ये कमीत कमी १० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. यामध्ये ६ चिनी नागरिकांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे या बसमध्ये ३६ चिनी नागरिक प्रवास करत होते. Bomb attack on Chinese engineer bus in Pakistan

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिनी अभियंते जात असताना बस रस्त्याशेजारी लपवण्यात आलेले स्फोटकांनी उडवून दिली आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्ताच्या माहिती नुसार हा हल्ला ठरवून केल्याच दिसत आहे. चीन- पाकिस्तान इकॉनमिक कॉरिडॉरचा एक भाग असलेल्या दासू बंधाऱ्याच्या बांधकाम करिता चीनचे इंजिनिअर आणि कामगार या बसमधून निर्माण स्थळी जात होते.

हे देखील पहा-

त्यांच्यासोबत पाकिस्तानचे २ सैनिक होते. या दोन्ही सैनिकांचा या स्फोटात मध्ये मृत्यू झाला आहे. सर्व जखमी आणि मृतांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलाने या स्फोटाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की, वरच्या बाजुच्या कोहिस्तान मध्ये चिनी इंजिनिअरांना घेऊन जाताना बसमध्ये स्फोट झाला आहे. Bomb attack on Chinese engineer bus in Pakistan

काही लोकांचा घटना स्थळावरच मृत्यू झाले आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने याबाबदल सांगितले आहे की, कमीत कमी १० लोक मारले गेले आहे. तर ३९ लोक हे यामध्ये जखमी झाले आहेत. अद्याप या स्फोटाचे कारण स्पष्ट झालेले नाही. कोहिस्तानचे उपायुक्त आरिफ खान यांनी याबद्दल माहिती दिली आहे की, हा हल्ला सकाळी ७.३० वाजता झाला आहे. सर्व चिनी कर्मचाऱ्यांना जलविद्युत प्रकल्पाकडे नेण्यात येत होते.

पाकिस्तानात चिनी इंजिनिअर्सच्या बसवर बॉम्ब हल्ला
बॉम्ब शोधक व नाशक पथकातील लूसी या श्वानाची तब्येत खालावल्याने मृत्यू 

या बसमधील चिनी कर्माऱ्यांसह सुरक्षा रक्षक आणि कामगार होते. यामध्ये बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. पोलिसांनी आणि सैन्यानी सर्व भाग घेरला गेले आहे. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्युतख्वा प्रांतामध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कॅप्टन अब्दुल बासित यांच्यासह ११ सैनिकांचा मृत्यू झाले आहे, तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काही सैनिकांना पकडून ठेवल्याची, माहितीदेखील समोर येत आहे. तहरीक- ए- तालिबान पाकिस्तानने हा हल्ला केल्याची शक्यता आहे. Bomb attack on Chinese engineer bus in Pakistan

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com