
पाटना(Patna) : बिहारमधील (Bihar News) नालंदा येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याला चक्कर आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे. फक्त चक्कर आली म्हणून हा विद्यार्थी चर्चेत कसा आला असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मात्र त्याला चक्कर येण्याचं कारणही अजब आहे.
परीक्षा केंद्रावर (Exam Center) सुमारे 500 विद्यार्थिनींना पाहून या विद्यार्थ्यांला भोवळ आली आहे, ही बाब आश्चर्यकारक आहे. आपल्या सभोवताली शेकडो मुलींना पाहून तो घाबरला आणि अचानक बेशुद्ध झाला, अशी कबुली खुद्द मुलाच्या कुटुंबीयांनीच दिली आहे. सध्या हा विद्यार्थी रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर (Viral on Social Media) या मुलाचा जोरदार चर्चा सुरु आहे.
नालंदामध्ये परीक्षेदरम्यान ब्रिलियंट कॉन्व्हेंट प्रायव्हेट स्कूलमध्ये ही घटना घडली. बिहार बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेदरम्यान मनीष शंकर या विद्यार्थ्याला चक्कर आली. मनीषला 500 विद्यार्थिनींमध्ये एकटेच परीक्षा केंद्रात बसवण्यात आले होते.
जास्त मुलींमध्ये बसल्यामुळे तो इतका घाबरला की परीक्षा देण्याऐवजी तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडल्यानंतर विद्यार्थ्याला तातडीने बिहार शरीफ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मनीषच्या नातेवाईकांनी सांगितले की, तो परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताच तिथे फक्त मुली होत्या. परीक्षा केंद्रावर ५०० विद्यार्थिनींमध्ये एकच विद्यार्थी होता. एकाच वेळी इतक्या मुली पाहून माझा भाचा घाबरला आणि बेशुद्ध झाला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.