Madhya Pradesh: धावत्या रेल्वेसोबत स्टंटबाजी आली जीवाशी! (पहा Video)

मध्य प्रदेशच्या Madhya Pradesh होशंगाबादमध्ये धावत्या रेल्वेसमोर स्टंटबाजी करणं एका तरुणाला जीवावर बेतल आहे.
Madhya Pradesh: धावत्या रेल्वेसोबत स्टंटबाजी आली जीवाशी! (पहा Video)
Madhya Pradesh: धावत्या रेल्वेसोबत स्टंटबाजी आली जीवाशी! (पहा Video)Saam Tv

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशच्या Madhya Pradesh होशंगाबादमध्ये धावत्या रेल्वेसमोर स्टंटबाजी करणं एका तरुणाला जीवावर बेतल आहे. आपल्या सोशल मीडियावर Social Media पोस्ट करण्यासाठी धावत्या रेल्वेसोबत व्हिडिओ शुटींग Video shooting with running train करण्याच्या प्रयत्नात तरुणाने आपला जीव गमावलं आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी त्या तरुणाचे धावत्या रेल्वेसोबत व्हिडिओ शूट करणे सुरु होते. मात्र, रेल्वेच्या इतका जवळ तो उभारला अन् या दरम्यान रेल्वेचा जोरदार धक्का लागला. यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. संजू चौरे (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वृत्तानुसार, भोपाळ - नागपूर रेल्वे लाईनवर इटारसीनजिकच्या पाजरा गावात राहणारा संजू चौरे आपल्या एका मित्रासोबत फिरायला जातो म्हणून बाहेर पडला. याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या मालगाडीसोबत व्हिडिओ शूट करू अशी इच्छा त्याने मित्राजवळ व्यक्त केली होती. संजू धावत्या मालगाडीसोबत धावत येणार आणि मित्र तो व्हिडिओ शूट Video Shoot करणार असे ठरले.

Madhya Pradesh: धावत्या रेल्वेसोबत स्टंटबाजी आली जीवाशी! (पहा Video)
इंधन दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टर प्लॅन तयार!

मात्र, व्हिडीओ शूट करणे सुरु होते तेवढ्यातच अत्यंत वेगात येणाऱ्या मालगाडीच्या रुळाच्या बाजुला उभ्या असलेल्या संजूचा तोल गेला आणि त्याला धावत्या मालगाडीचा जोरदार धक्का बसला अन् तो रेल्वे रुळाच्या बाजुला फेकला गेला. संजूला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पथरौटा स्टेशन प्रभारी नागेश वर्मा यांनी माहिती दिली की, रविवारी सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली.

Edited By-Sanika Gade

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com