प्रियकराने वरातीत दिला लग्नास नकार; प्रेयसीने केला राडा, अन् धसक्याने मामाचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील Uttar Pradesh आग्रा Agra शहरातील शाहगंज भागात मंगळवारी एक विचित्र घटना घडली आहे.
प्रियकराने वरातीत दिला लग्नास नकार; प्रेयसीने केला राडा, अन् धसक्याने मामाचा मृत्यू
प्रियकराने वरातीत दिला लग्नास नकार; प्रेयसीने केला राडा, अन् धसक्याने मामाचा मृत्यूSaam Tv

लखनऊ : उत्तर प्रदेशातील Uttar Pradesh आग्रा Agra शहरातील शाहगंज भागात मंगळवारी एक विचित्र घटना घडली आहे. एका लग्नाच्या वरातीत अचानक एक तरुणी येऊन धडकते आणि ती आपण नवरदेवाची मैत्रीण (Girlfriend) असल्याचा दावा करते. तर ती त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत मोठा गोंधळ घातला आहे. नवरदेवाने लग्न करण्यास सरळ नकार दिल्यानंतर तरुणीने विष Poison प्राशन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा काही जणांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळ पाहून वधूच्या मामाची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.

हे देखील पहा-

घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूर सिक्री येथून मंगळवारी रात्री आग्रा शहरात ही लग्नाची वरात आली होती. वरात ऐन रंगात आली असताना एक तरुणी तिथे पोहोचली. तिने वर सोबत आपले प्रेमसंबंध Love Affair असल्याचा दावा केला. हे ऐकून उपस्थितांमध्ये कुजबूज रंगली आणि ती म्हणाली, “आम्ही दोघेही हॉटेलमध्ये एकत्र काम करत होतो. तेव्हा आमची भेट झाली आणि नंतर ओळखीचं रुपांतर पुढे मैत्रीत झालं आणि आमचं प्रेम जडलं. तरुणाने म्हणजेच तिच्या त्यावेळेसच्या प्रियकराने आपल्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र आता तो दुसऱ्या मुलीशी लग्न करत आहे” अशी आपली गोष्ट तरुणीने सर्वांसमोर मांडली.

विशेष म्हणजे तरुणीने पोलिसांनाही सोबत आणले होते. वृत्तानुसार, प्रेयसीने नवरदेवाला निक्षून विचारले होते की, तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? यावर प्रियकराने लग्न साफ नकार दिला अन् हे ऐकून मुलीने विष खाण्याचा प्रयत्न केला. तिला उपस्थित व्हराडी मंडळींनी कसेबसे रोखले.

प्रियकराने वरातीत दिला लग्नास नकार; प्रेयसीने केला राडा, अन् धसक्याने मामाचा मृत्यू
रायगड: दिवेआगरच्या सुवर्ण गणेश मुखवट्याची पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठा!

मामाने घेतला धसका

हा गोंधळमध्ये वधूच्या मामाची प्रकृती अचानक बिघडली. ज्या तरुणाच्या गळ्यात आपली भाची वरमाला घालणार आहे, त्या नवरदेवाचे प्रताप ऐकून मामाला भोवळचं आली. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मामाविषयी वधू पक्षाने सांगितले की, त्यांना बसलेला धक्का इतका जबर होता. यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com