New York: अग्नीतांडवातून वाचले बाळ; आईच्या कुशीत जाताच दिली गाेड स्माईल

एका बॅलेंकटमध्ये त्याला गुंडाळले हाेते. सुरक्षितता म्हणून त्या महिलेस शिडीवरुन खाली उतरण्याची सूचना मी खूण करुन केली.
Fire fighter Matt Zimpfer rescuing a baby from deadly bronx fire
Fire fighter Matt Zimpfer rescuing a baby from deadly bronx firesaam tv

न्यूयॉर्क: मी नायक नसून केवळ माझे कर्तव्य बजावले आहे. हा माझ्या कामाचा एक भाग आहे. ज्या क्षण मूल मी त्याच्या आईच्या हातात दिले ताे क्षण आठवला की खूप आनंद हाेताे असे अग्नीशमन दलाचा कर्मचारी मॅट झिम्पफर (Matt Zimpfer) याने प्रांजळपणे नमूद केले. न्यूयॉर्क शहरातील (New York City) एका अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत नऊ मुलांसह १९ नागरिकांचा मृत्यू झाला. या आगीत माेठ्या संख्येने नागरिक जखमी झाले. या भीषण आगीतून एका बाळाला वाचविण्यात मॅट झिम्पफर यांना वाचविण्यात यश आले. (fireman mart zimpfer recalls moment he saved baby from blaze)

झिम्पफर न्यू याॅर्क पाेस्टशी संवाद साधताना म्हणाला ही आग (fire) खूप भडकली हाेती. या आगीशी लढण्यासाठी आमचे दल धडपडत हाेते. मी चौथा ट्रक (fire brigade) आणला होता. घटनास्थळी पाेहचताच मी पाहिले इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर एक जण खिडकीच्या चौकटीवर बसला होता. त्याने स्वतः खिडकीची काच बाहेर काढली होती आणि खिडकीबाहेर पडण्यासाठी प्रयत्न करीत हाेताे. परंतु त्याचा पाय घसरला आणि तेथेच लटकू लागला.

आमच्या पथकाने लगेच वाहनावरील शिडी उचलली आणि त्याच्या बचावासाठी प्रयत्न सुरु केले. या खाेलीत काही युवक हाेते. ते शिडीवरुन खाली उतरु लागले. उतरताना ते माझ्या पायाखाली सरपटत उतरत हाेते. एका महिलेने तिचे बाळ माझ्या हातात दिले. एका बॅलेंकटमध्ये त्याला गुंडाळले हाेते. सुरक्षितता म्हणून त्या महिलेस शिडीवरुन खाली उतरण्याची सूचना मी खूण करुन केली.

मी बाळाला दुसर्‍या अग्निशामकाकडे सुपूर्द करण्यास सक्षम होताे परंतु बाळाच्या आईने त्याचे काका खाेलीत अडकल्याचे सांगितले. मी पुन्हा बाळाला घट्ट पकडून एक पायरीवर चढलाे. आता डाेकावून पाहिले पण धूराच्या लाेटामुळे मला काहीच दिसत नव्हते. अखेरीस बाळास घेऊन खाली उतरलाे. बाळ धुराच्या लाेटात हाेते परंतु ते जागे हाेते त्याला काेणतीही इजा पाेहचू दिली नाही. अन्य बचाव कार्य सुरु ठेवण्यासाठी बाळाला सहका-याकडे सुपुर्द करुन मी पुन्हा कामगिरीवर गेला असे झिम्पफरने नमूद केले. (Fire fighter Matt Zimpfer rescuing a baby from deadly bronx fire)

Fire fighter Matt Zimpfer rescuing a baby from deadly bronx fire
Bronx Fire: न्यूयॉर्क शहरातील आगीत ९ मुलांसह १९ मृत्यूमुखी; ध्वज अर्ध्यावर घेतले
Matt Zimpfer
Matt ZimpferSaam Tv

झिम्पफर म्हणाला आज मला तुमच्याकडून समजत आहे बाळाची आणि त्याच्या आईची भेट हाेताच बाळाने गाेड स्माईल दिली. आमच्यासाठी खरतरं ही आनंददायीबाब आहे. धुरातून लढा देणे हे सर्वात मोठे आव्हान आमच्यासाठी होते, परंतु सांघिक प्रयत्नांमुळे ते यशस्वी झाले. प्रत्येकजण झटत हाेता. संपुर्ण बचाव कार्य साधारणत: सहा तास चालले. आमचे २०० जणांचे पथक एका ध्येयाने कार्यरत हाेते. ते म्हणजे लाेकांचे जीवन आणि मालमत्ता वाचविणे. ज्यांना आम्ही गमावले त्यांच्याबद्दल दुख आहे परंतु एकंदरीत आम्ही काही लोकांना बाहेर काढले हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com