Breaking News : नोटांनी भरलेल्या RBI च्या ट्रकचा भीषण अपघात!

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नोटा घेऊन जात असलेले तीन ट्रक एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला आहे. एकूण पाच ट्रकचा ताफा होता.
Breaking News : नोटांनी भरलेल्या RBI च्या ट्रकचा भीषण अपघात!
Breaking News : नोटांनी भरलेल्या RBI च्या ट्रकचा भीषण अपघात!SaamTv

चंदीगड : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) नोटा घेऊन जात असलेले तीन ट्रक एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला आहे. एकूण पाच ट्रकचा ताफा होता. एकामागे एक जात असलेल्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या ट्रकला हा अपघात झाला आहे. चंदीगड मधील सेक्टर-26 चौकाजवळ हा अपघात झाला.

या अपघाताची भीषणता इतकी होती की तिसऱ्या आणि चौथ्या ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातातील चौथ्या क्रमांकाच्या ट्रकमधील महिला कॉन्स्टेबलला अपघातानंतर लोकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. नंतर क्रेन आणि कटरच्या मदतीने पोलिसांनी सुमारे एक तासानंतर या महिला कॉन्स्टेबलला बाहेर काढण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात एक पुरुष हवालदारही जखमी झाला आहे.

हे देखील पहा :

पोलिसांनी ट्रक चालक तेजिंदर सिंग आणि गुरबेज सिंग यांच्यावर निष्काळजीपणा केल्याबद्दल आणि वाहनांमध्ये योग्य अंतर न ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. काल सोमवारी आरबीआयचे पाच ट्रक रेल्वे स्थानकातून सेक्टर-17 मधील आरबीआय कार्यालयाकडे जात होते. ट्रकमधील पैशांमुळे पोलिसांचा ताफा देखील या ट्रकसोबत होता. दुपारी 2 वाजेच्या सुमारास, वाहतूक सेक्टर -26 चौकातून पुढे जाताच, सेक्टर -26 चौकाच्या आधीच्या वाहतुकीमुळे, पुढे जाणाऱ्या पोलिसांच्या भरधाव वाहनाने ब्रेक लावले. अ

Breaking News : नोटांनी भरलेल्या RBI च्या ट्रकचा भीषण अपघात!
Crime : झोपेच्या गोळ्या खाऊन महिलेची दोन मुलांसह आत्महत्या!

शा स्थितीत मागून येत असलेले पहिले आणि दुसरे ट्रकही अचानक थांबले. यामध्ये तिसऱ्या ट्रकच्या ड्रायव्हरनेही अचानक ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रेक न लागल्याने हा ट्रक जोरात जाऊन दुसऱ्या क्रमांकाच्या ट्रकला जाऊन धडकला. पाठोपाठ चौथ्या ट्रकच्या ड्रायव्हरने बचावासाठी ट्रकला उजव्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला, मात्र, वेग जास्त असल्याने तो देखील हा अपघात टाळू शकला नाही.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com