
Pakistan Bride Groom: लग्न (Wedding) म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण. प्रत्येकजण आपले लग्न धामधुमीत होण्यासाठी प्रयत्न करत असतो. ज्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करायलाही लोक मागेपुढे पाहत नाहीत. पण सध्या एका लग्नाच्या वरातीची सोशल मीडियावर तुफान चर्चा पाहायला मिळत आहे.
व्हिडिओमध्ये (Viral Video) नवरा नवरीची चक्क गाढवावरुन मिरवणूक काढल्याचे दिसत आहे. या आगळ्या वेगळ्या वरातीने नेटकऱ्यांनाही चकित केले आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेवू...
लग्नाच्या हटके एंट्रीचे किंवा वरातीचे तसे तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. कुणी बाईकवर, कुणी रथावर, कुणी तर बुल्डोझरवरही बसून आलं आहे. पण तर कुणी कधी गाढवावर बसण्याचा विचार तरी करेल का? तेसुद्धा वधू-वर. लग्नाचा क्षण प्रत्येकासाठी खास असतो, मात्र थेट गाढवावरुन एन्ट्री मारण्याची कोणी विचार करुच शकत नाही. पण अशा एका वरातीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये वर-वधू एका गाढवगाडीवर बसले आहेत. म्हणजे गाढव ही गाडी खेचतो आहे. त्यांच्या आजूबाजूला बरेच लोक आहेत. गाढवावरून एंट्री करताना नवरा-नवरी एकदम आनंदात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे.
लग्नाचा हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानातील (Pakistan) असल्याचं सांगितलं जातं असून @pakistan_glitz इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या कपलने गाढवावरून का एंट्री केली असेल, याबाबत आपापली मतं मांडली आहेत. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. काही युझर्सच्या मते, हे सर्व प्रसिद्धीसाठी केलं जात आहे. तर काही युझ्रस्च्या मते, पाकिस्तानातील वाढत्या महागाईमुळे असं केलं असेल.
दरम्यान, काहीही असले तरी या त्यांच्या हटके एन्ट्रीमुळे हे लग्न मात्र सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रियांंचा पाऊस पाडला आहे. पण अशी एन्ट्री करण्यामागे नेमकं काय कारण असेल, पाकिस्तानमधील काही प्रथा की चर्चेत येण्याचा बहाणा असा प्रश्न मात्र सर्वांनाच पडला आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.