नवरी चिडली, झाला राडा, हार घालताना उचलणाऱ्याच्या लगावली श्रीमुखात; पाहा Video

मागून एक माणूस नवरीला उचलून वराच्या बरोबरीने उभा करतो. आणि वधू आणि वर एकमेकांना गळ्यात हार घालतात.
नवरी चिडली, झाला राडा, हार घालताना उचलणाऱ्याच्या लगावली श्रीमुखात; पाहा Video
लग्नात हार घालताना उचलायाची प्रथा पडली महागात, नवरीने दिला मार; पाहा VideoSaam TV

Viral Video: लग्नाचे असंख्य व्हायरल व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी लग्नात वधू आणि वराचा डान्स तर कधी वधूच्या एंट्रीचा व्हिडीओ तुम्ही पाहिलाच असेल. पण हार घालतानाचा असा व्हिडिओ तुम्ही क्वचितच पाहिला असेल, जो पाहून तुम्ही हसू रोखू शकणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसत असेल की हार घालायची तयारी सुरू आहे. हार घालतेवेळी वधू-वरांव्यतिरिक्त त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यही तेथे उपस्थित होते. मुलगी हार घालत असताना, नवऱ्याचे मित्र नवरदेवाला उचलतात, त्यानंतर वधूचा हात वरापर्यंत पोहोचत नाही. यानंतर वधू काही काळ थांबते. (Jaimala Viral Video)

दरम्यान, मागून एक माणूस नवरीला उचलून वराच्या बरोबरीने उभा करतो. आणि वधू आणि वर एकमेकांना गळ्यात हार घालतात. यानंतर, जेव्हा तो पुरुष वधूला खाली घेऊन जातो, तेव्हा वधू त्याला जोरदार कानशिलात लगावते. त्या व्यक्तीला काहीच समजत नाही. इतक्यात समोर उभी असलेली एक स्त्री हसू लागते. हे पाहून त्या पुरुषाचाही संयम सुटतो आणि तो महिलेच्याही कानाखाली मारतो.

लग्नात हार घालताना उचलायाची प्रथा पडली महागात, नवरीने दिला मार; पाहा Video
दातृत्व! मुलीच्या लग्नाचा खर्च टाळून डॉक्टरने शेतकरी कुटूंबाला दिलं घर बांधून

हा व्हायरल व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. हार घालण्या दरम्यान थप्पडांचा पाऊस बघून लोकं खूप आनंद लुटत आहेत. हा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ५३ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास २ लाख वेळा पाहिला गेला आहे. यासोबतच लोक मजेशीर कमेंटही करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.