Viral : खड्डे आणि चिखलमय रस्त्यात नववधूचं फोटोशूट; VIDEO व्हायरल

ही नववधू रस्त्यावरील चिखल आणि खड्ड्यात फोटोशूट करताना दिसत आहे
Trending Viral Video News
Trending Viral Video News Saam Tv

Viral Video News : लग्नाचा दिवस प्रत्येकासाठी (Wedding) खास खूप असतो. हा सुंदर क्षण आणखी अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकजण प्री-वेडिंग फोटोशूट करतात. सध्या ब्राइडल फोटोशूट देखील ट्रेंडमध्ये आहे. यासाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटोशूट करून घेतात. केरळमधील एका तरुणीने नववधूच्या जोड्यात असे फोटो शूट केलेत जे सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. (Wedding Funny Video)

Trending Viral Video News
Funny Video : उंदराला पाहून मांजराला घामच फुटला, ठोकली धूम; VIDEO पाहून पोट धरून हसाल

वास्तविक, ही नववधू रस्त्यावरील चिखल आणि खड्ड्यात फोटोशूट करताना दिसत आहे. या अनोख्या फोटोशूटचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधूच्या वेशात एक तरुणी रस्त्यावरून चालताना दिसत आहे. रस्त्यावर अनेक खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी तुंबले आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखलही पसरला आहे. ज्या रस्त्यावर फोटोशूट केले जात आहे, त्या रस्त्यावर दूरवर फक्त खड्डेच दिसत असल्याचे व्हायरल क्लिपमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये (Viral Video) नववधू हे खड्डे टाळत पुढे जाताना दिसत आहेत. या दरम्यान फोटोग्राफरही काही इशारे करताना दिसत आहे. या फोटोशूटच्या माध्यमातून नववधूने परिसरातील मोठ्या समस्येवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या अनोख्या फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (wedding Viral Video)

नववधूच्या या अनोख्या फोटोशूटचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर Arrow_weddingcompany नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला नेटकरी तुफान प्रतिसाद देत आहेत. युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रस्त्याच्या मधोमध वधूचे अनोखे फोटोशूट.'

या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे. 11 सप्टेंबर रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला सुमारे 4 लाख लोकांनी लाइक केले आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की लोकांना हा व्हिडिओ किती आवडला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com