
Rajasthan Latest News: बहीण- भावाचे नातं (Brother- Sister Relation) हे खूपच अतूट असतं. भाऊ हा बहिणीचे रक्षण करत असतो. अशाच बहीण भावाच्या अनमोल नात्याची प्रचिती राजस्थानमध्ये (Rajasthan) घडलेल्या एका घटनेतून आली आहे. एका भावाने आपल्या बहिणीच्या जळत्या चितेवर उडी मारल्याची घटना समोर आली आहे. राजस्थानच्या भिलवाडमध्ये ही धक्कादयक घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातल्या मांकियास गावामध्ये ही घटना घडली. याठिकाणी मीना नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला. मीना यांच्या निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वजण स्मशानभूमीत गेले. चितेला अग्नी दिल्यानंतर सर्व नातेवाई आणि ग्रामस्थ दूर जाऊन बसले. त्यानंतर अचानक मीना यांचा भाऊ सुखदेवने त्यांच्या जळत्या चितेत उडी मारली.
या घटनेमुळे स्मशानभूमीत एकच खळबळ उडाली. अशामध्ये घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी सुखदेवला बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या सुखदेवला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत सुखदेव हा शंभर टक्के भाजला आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आधीच मीनाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यातच सुखदेवच्या या कृत्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला.
सुखदेव आणि मीना हे चुलत भावंडं आहेत. पण एखाद्या सख्या बहीण- भावाप्रमाणे त्यांचे नातं होतं. या बहीण-भावाचा एकमेकांवर खूपच जीव होता. सुखदेव हे कधीच मीना यांना एकटे सोडत नव्हते. या प्रेमामुळेच सुखदेव यांना बहीण मीनाचे निधन झाल्यानंतर खूपच मोठा धक्का बसला. बहिणीचे असे अचानक जाणं सहन न झाल्याने दु:खात असलेल्या सुखदेव यांनी थेट बहिणीच्या चितेत उडी मारली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सगळीकडे याची चर्चा होत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.